Swami Vivekananda Jayanti 2026 : स्वामी विवेकानंदांचे 'हे' 10 अनमोल विचार वाचा अन् करा शुभेच्छा शेअर

Swami Vivekananda Jayanti 2026 : "उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका!" हा जगप्रसिद्ध संदेश देणारे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी १२ जानेवारी रोजी 'राष्ट्रीय युवा दिन' म्हणून साजरी केली जाते. आध्यात्मिक क्रांती आणि भारतीय संस्कृतीचा डंका जगभरात वाजवणारे विवेकानंद आजही कोट्यवधी तरुणांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवण्यासाठी खास शुभेच्छा संदेश आणि जीवनाला नवी दिशा देणारे त्यांचे १० अनमोल विचार आम्ही येथे घेऊन आलो आहोत.

Swami Vivekananda Jayanti

स्वामी विवेकानंद यांचे १० अनमोल विचार (Quotes)

१. "उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही, तोपर्यंत थांबू नका."
२. "स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे."
३. "ब्रह्मांडातली सर्व शक्ती आधीच आपल्यात आहे. आपणच आपल्या डोळ्यांवर हात ठेवतो आणि म्हणतो की किती अंधार आहे."
४. "एका वेळी एकच काम करा आणि ते करताना आपले संपूर्ण आयुष्य त्यात ओतून द्या."
५. "तुम्ही जेवढे बाहेर जाऊन इतरांचे भले कराल, तेवढेच तुमचे हृदय शुद्ध होईल आणि स्वतःचा आत्मा जागृत होईल."
६. "सत्य हजारो प्रकारे सांगता येते, तरीही ते सत्यच राहते."
७. "पवित्रता, संयम आणि सातत्य या तिन्ही गोष्टी यशासाठी आवश्यक आहेत."
८. "प्रत्येक कामाला आधी लोक हसतात, नंतर विरोध करतात आणि शेवटी त्याचा स्वीकार करतात."
९. "अनुभव हाच जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे."
१०. "ज्या दिवशी तुमच्या समोर एकही अडचण येणार नाही, त्या दिवशी समजा की तुम्ही चुकीच्या मार्गावरून प्रवास करत आहात."

१० खास शुभेच्छा संदेश (Wishes)

१. राष्ट्रनिर्माते आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
२. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची शिदोरी घेऊन प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकूया. राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
३. युवकांनो, आपल्यातील सुप्त शक्ती ओळखा आणि देशाला प्रगत बनवा. स्वामी विवेकानंद जयंतीच्या शुभेच्छा!
४. ध्येयवेड्या तरुणांचे स्फूर्तिस्थान स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
५. आधुनिक भारताचे शिल्पकार स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
६. चला, आजच्या दिवशी विवेकानंदांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया. राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
७. सामर्थ्य आणि शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या स्वामी विवेकानंदांना त्यांच्या जयंती दिनी वंदन!
८. तरुणाईची ताकद आणि विवेकानंदांचे विचार, हाच आहे भारताच्या प्रगतीचा आधार. हार्दिक शुभेच्छा!
९. तुमच्या स्वप्नांना पंख द्या आणि विवेकानंदांच्या विचारांनी गरुडभरारी घ्या. राष्ट्रीय युवा दिनाच्या शुभेच्छा!
१०. विवेकाने वागूया, आनंदाने जगूया... स्वामी विवेकानंद जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+