Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे', स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त 10 मराठीत खास शुभेच्छा संदेश

Swami Samarth Prakat Din Wishes in Marathi: आज सोमवारी 31 मार्च रोजी हा स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन तसेच जयंती महोत्सव म्हणून साजरा केला जातो. स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि गुरू होते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणाता त्यांचे भक्त आहेत. त्यांच्या कृपेने लाखो भक्तांच्या जीवनात परिवर्तन घडलं आहे. श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन हा तिथी प्रमाणे चैत्र शुध्द द्वितीया या दिवशी असतो. त्यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट येथे उत्सव साजरा केला जातो. या दिवशी भाविक मोठ्या दर्शनासाठी गर्दी करतात.

अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रेयाचे चौथे अवतार मानलं जातं. त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला खास महत्व आहे. यावर्षी 31 मार्च 2025 रोजी सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन तसेच स्वामी समर्थ यांची जयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे. यंदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा 169 वा प्रकटदिन सोहळा पार पडत आहे.

swami samarth prakat din 2025

स्वामी समर्थ महाराज यांची शिकवण, "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वचन सर्व भक्तांसाठी एक प्रेरणा ठरते. त्यांच्या या वचनाने प्रत्येक भक्ताला मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. आजच्या या खास दिवशी तुमच्या प्रियजनांना स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या खास मराठमोळ्या शुभेच्छा द्या.

अशक्य ही शक्य करतील
श्री स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिनानिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

swami samarth prakat din 2025

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.
श्री स्वामी समर्थ महाराज
प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा !

जय जय सद्गुरू स्वामी समर्था
आरती करू गुरुवर्या रे
अगाध महिमा तव चरणाचा वर्णाया मती दे वा रे
श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त शुभेच्छा!

भक्त वत्सल खरा तू एक होसी
म्हणूनी शरण आलो तुझिया चरणांसी
श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

स्वामी समर्थांची कृपा जिथे असते
तिथे संकटेही दूर पळतात.
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थ म्हणतात..
"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे!"
संकटे कितीही मोठी असली तरी
श्रद्धा आणि सबुरीने त्यावर मात करता येते.

swami samarth prakat din 2025

स्वामी समर्थांची कृपा राहो,
जीवनात सुख-समाधान लाभो!
नित्य त्यांच्या नामस्मरणाने,
संकटांचे सावटही निघून जाओ!!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थांचा मंत्र जपला की,
आयुष्य सुख, समाधान आणि समृद्धीने भरून जातं.
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जय जय स्वामी समर्थ!
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू कोणाला फसवू नको,
मी आहे तुझ्या पाठीशी,
तुझी फसवणूक होऊ देणार नाही
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा !

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+