Grahan 2026 नवीन वर्षात तब्बल 4 ग्रहणे! भारतात कोणती दिसणार? होळीच्या दिवशी चंद्रग्रहण; वाचा डिटेल्स
Surya Grahan Chandra Grahan 2026 Dates : खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने २०२६ हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. नवीन वर्षात एकूण ४ ग्रहणे लागणार असून यामध्ये २ सूर्यग्रहणे आणि २ चंद्रग्रहणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, वर्षातील पहिलेच चंद्रग्रहण होळीच्या दिवशी येत असल्याने धार्मिक क्षेत्रात याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. या ग्रहणांपैकी भारतात नेमकी कोणती ग्रहणे दिसणार आणि सुतक काळ कुठे पाळायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत.

२०२६ मधील सूर्यग्रहणे (Surya Grahan 2026)
१७ फेब्रुवारी २०२६ (पहिले सूर्यग्रहण)
हे वर्षातील पहिले सूर्यग्रहण असेल. हे ग्रहण आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे. भारतात हे ग्रहण दिसणार नसल्यामुळे याचा सुतक काळ मान्य नसेल. (वेळ: दुपारी ३:२६ ते रात्री ७:५७)
१२ ऑगस्ट २०२६ (दुसरे सूर्यग्रहण)
हे ग्रहण युरोप, कॅनडा आणि ग्रीनलँडमध्ये दिसेल. भारतात हे ग्रहण रात्री ९:०४ ते पहाटे ४:२५ दरम्यान असेल, त्यामुळे ते भारतात दिसणार नाही आणि सुतक काळही पाळण्याची गरज नाही.
२०२६ मधील चंद्रग्रहणे (Chandra Grahan 2026)
३ मार्च २०२६ (पहिले चंद्रग्रहण - होळी)
हे २०२६ मधील पहिले चंद्रग्रहण असेल जे भारतात दिसणार आहे. फाल्गुन पौर्णिमेला म्हणजेच होळीच्या दिवशी हे 'खंडग्रास' चंद्रग्रहण लागणार आहे. भारतात हे ग्रहण दुपारी ३:२० ते संध्याकाळी ६:४७ पर्यंत असेल. यामुळे भारतात सुतक काळ मान्य असेल आणि होळीच्या पूजेवरही याचा परिणाम होऊ शकतो. सुतक काळ सकाळी ६:२० पासून सुरू होईल.
२८ ऑगस्ट २०२६ (दुसरे चंद्रग्रहण)
हे वर्षातील शेवटचे ग्रहण असेल, परंतु ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचे वेध किंवा सुतक काळ भारतात पाळला जाणार नाही.
धार्मिक मान्यता आणि काय करावे?
ग्रहण काळात हिंदू धर्मात काही नियम पाळले जातात
- काय करावे: गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून अन्न, वस्त्र किंवा धनाचे दान करावे.
- काय टाळावे: ग्रहण काळात भोजन करू नये. झोपणे, प्रवास करणे किंवा शुभ कार्य करणे टाळावे. तसेच टोकदार वस्तूंचा वापर करणे टाळावे.












Click it and Unblock the Notifications