Surya grahan 2025 'या' तारखेला वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, भारतात दिसणार का? कुठे- कुठे दिसणार, वाचा
Surya grahan 2025 kadhi ahe date time : गेल्या दहा दिवसांपुर्वीच चंद्रग्रहण झाले आणि ते भारतात दिसले होते, आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण दिसणार आहे. २१ सप्टेंबर २०२५ रोजी हे सूर्यग्रहण होईल. त्यामुळे आता ते कधी होईल, वेळ काय असेल आणि कुठे कुठे होईल याची माहिती सविस्तर जाणून घेऊया.

सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची खगोलीय घटना असून तिला वैज्ञानिक अधिष्ठान आहे पण बरेच लोक याला धार्मिक अधिष्ठानाशी जोडतात ती धारणा गेल्या कित्येक शतकांपासून आहे. सूर्यग्रहण भारतात दिसेल का हा प्रश्न सातत्याने विचारला जात असून याचे उत्तर म्हणजे या सूर्यग्रहणाचा भारतातून कोणताही परिणाम दिसणार नाही हे आहे. त्यामुळे भारतात सूतक काळ किंवा कोणतेही धार्मिक नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
सूर्यग्रहण २०२५: तारीख, वेळ आणि कुठे दिसणार?
तारीख: २१ सप्टेंबर २०२५
वेळ: सकाळी ११:०० ते दुपारी ३:३० पर्यंत (भारतीय वेळेनुसार)
कुठे दिसणार सूर्यग्रहण : ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण पॅसिफिक महासागर, आफ्रिकेचा काही भाग आणि हिंदी महासागरात हे ग्रहण दिसणार आहे.
येथे दिसणार नाही सूर्यग्रहण : भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत हे ग्रहण दिसणार नाही.
भारतात का दिसणार नाही सूर्यग्रहण?
वेळेचा अभाव: २१ सप्टेंबर रोजीचे सूर्यग्रहण रात्रीच्या वेळी घडेल, त्यामुळे ते भारतातून दिसणार नाही.
भौगोलिक स्थान: हे ग्रहण मुख्यत्वे दक्षिण गोलार्धात, विशेषतः न्यूझीलंड आणि पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल.
भारतावर कोणताही परिणाम नाही
हिंदू परंपरेनुसार, सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सूतक काळ सुरू होतो. या काळात धार्मिक विधी, खाणे आणि शिजवणे टाळले जाते. पण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे, येथे सूतक काळ लागू होणार नाही. मंदिरे आणि घरांमध्ये नेहमीप्रमाणेच दैनंदिन विधी सुरू राहतील.
ज्योतिषशास्त्र आणि वैज्ञानिक दृष्टीकोन
ज्योतिषशास्त्रानुसार, हे ग्रहण कन्या राशी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात होणार आहे. या काळात सूर्य आणि बुध एकत्र येऊन 'बुद्धादित्य राजयोग' तयार करतील. जरी हे ग्रहण भारतातून दिसणार नसले तरी, काही ज्योतिषींच्या मते त्याचा सूक्ष्म प्रभाव काही राशींवर होऊ शकतो.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ खगोलीय घटना आहे, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि सूर्याचा प्रकाश पूर्णपणे किंवा अंशतः अडवतो. ही घटना जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी आणि निरीक्षकांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिली आहे.
हेही वाचा : मंगळाचा तुळ राशीत प्रवेश! 'या' 6 राशींचे नशीब पालटणार, धनवर्षाव होणार! तुमची रास आहे का? वाचा












Click it and Unblock the Notifications