मंगळाचा तुळ राशीत प्रवेश! 'या' 6 राशींचे नशीब पालटणार, धनवर्षाव होणार! तुमची रास आहे का? वाचा
Mangal Gochar 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ताऱ्यांच्या संक्रमणाचा अनेक गोष्टींवर परिणाम होतो, मंगळ ग्रहाने 13 सप्टेंबर 2025 रोजी तूळ राशीत प्रवेश केला आहे. या संक्रमणामुळे काही राशींसाठी खूप चांगले दिवस येणार आहेत. मंगळ ग्रह ऊर्जा, साहस आणि गतीचे प्रतीक आहे, तर तूळ राशी संतुलन, न्याय आणि नात्यांचे प्रतीक आहे. या दोन्ही ग्रहांच्या संयोगामुळे काही राशींना प्रचंड फायदा होणार आहे अशे ज्योतिषशास्त्र सांगते.
ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्या सहा राशींच्या लोकांना चांगले दिवस आणि चांगले अनुभव येतील तसेच धनवर्षाव होईल हे आपण जाणून घेऊया.

मेष: या राशीच्या लोकांना धनलाभ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात.
कर्क: तुमच्या नशिबाचे दार उघडेल. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.
सिंह: तुमच्या ऊर्जा पातळीत वाढ होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे आणि तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल.
कन्या: तुमच्यासाठी नवीन संधींची दारे उघडतील. आर्थिक फायदा होईल आणि तुमचे संबंध अधिक स्थिर होतील.
मकर: तुमच्यासाठी हा काळ खूप फलदायी असेल. पैशांची आवक वाढेल आणि तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कुंभ: तुम्हाला प्रचंड धनलाभ होईल. तुम्ही जे काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल.
अशा प्रकारे या सहा राशींवर माता लक्ष्मीची कृपा होईल, ज्यामुळे त्यांच्यासाठी धनलाभाचा योग आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठी सल्ला
- ज्यांच्या राशीत मंगल ग्रहाने प्रवेश केला आहे, त्या तूळ राशीच्या लोकांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही निर्णय अतिशय आवेशात किंवा घाईगडबडीत घेऊ नका. थोडे संयम ठेवा, अन्यथा केलेले काम बिघडू शकते.
- ज्योतिषशास्त्रानुसार, जर तुमच्या कुंडलीत मंगल दोष असेल, तर तुम्ही हे उपाय करू शकता..
- प्रत्येक मंगळवारी उपवास करा आणि हनुमानजी व मंगल देवाची पूजा करा.
- लाल कपडे, मसूर डाळ, गूळ आणि तांब्याची भांडी दान करा.
- मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालीसा वाचा.
- मंगळवारी माकडांना गूळ-चणे किंवा गोड पोळी खाऊ घाला.
- दुर्गा मातेला लाल वस्त्र आणि शेंदूर अर्पण करा.
मंगल देव मंत्र
"ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः ॥"
"ॐ अङ्गारकाय विद्महे, शक्ति हस्ताय धीमहि, तन्नो भौमः प्रचोदयात् ॥"
"धरणीगर्भसंभूतं विद्युत्कान्तिसमप्रभम्। कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणम्यहम्॥"
हेही वाचा : Khote bolnarya rashi: या राशी खोटे बोलण्यात असतात माहिर! जाणून घ्या कोणती राशी सर्वात मोठी खोटारडी?












Click it and Unblock the Notifications