Shravan 2025 : आज तिसरा श्रावण सोमवार, कोणती शिवमुठ वाहावी, पुजा कशी करावी जाणून घ्या सर्व माहिती
Shravan 2025 Aaj third sawan somwar : आज तिसरा श्रावण सोमवार या सोमवारी कोणती शिवामुठ वाहावी, पूजा कशी करावी? यासंदर्भात अनेक प्रश्न असतात याच प्रश्नांचे निराकरण आज आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.
भगवान शिवाला जसे बिल्वपत्र आवडते, म्हणून बेलाचे महत्व आहे तसेच शिवामुठ व्रताचेही खूप महत्व आहे. असंख्य महिला शिवामुठ भगवान शिवाला अर्पण करतात. विवाह नंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवमुठ अर्पण केली जाते.

कोण-कोणती शिवामुठ अर्पण करावी
श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य भगवान शिवाला अर्पण केले जाते, पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी अनेक शिवभक्त शिवलिंगाची पूजा करतात म्हणूनच श्रावण सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू अशा धान्यांची शिवमुठ भगवान शिवाला अर्पण करावी. यात जर पाचवा सोमवार असेल तरच सातूची शिवामुठ महादेवाला वाहावी. चार सोमवार आले असतील तर तांदूळ, तीळ, मूग आणि जवस या धान्यांची शिवमुठ वाहावी.
शिवमुठ वाहण्याची पद्धत
- प्रत्येक सोमवारी श्रावणातील प्रत्येक सोमवारी सकाळी स्नान करून उपवास धरावा.
- महादेवाची विधिवत पूजा करावी.त्यााठी सकाळीच शुभ मंदिरात जावं किंवा घरातही तुम्ही शिवलिंगाची पूजा करू शकता.
- महादेवाला गंगाजल आणि दुधाने अभिषेक करावा.
- त्यानंतर महादेवाला चंदन बिल पत्र अक्षता पांढरे फुलं मध फळ साखरेचा नैवेद्य दाखवावा, तत्पुर्वी अगरबत्ती, समई लावावी.
- शिवामुठ अर्पण करावी आणि त्यानंतर सोमवारची कथा वाचावी तसेच शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून आरती करावी.
- प्रत्येक सोमवारी भगवान शिवाला अशा पद्धतीने आपण शिवमुठ अर्पण करु शकतो.
आज तिसऱ्या श्रावण सोमवारी कोणती शिवामुठ वाहावी
- तिसरा श्रावण सोमवार आज ११ ऑगस्ट २०२५ असून मूगाची शिवमुठ वाहावी.
- चौथा श्रावण सोमवार १८ ऑगस्ट २०२५ रोजी असून या दिवशी जवसाची शिवमुठ वाहावी.
श्रावणात अशी करा पुजा
- श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या पुजेला महत्व आहे त्यामुळे पुजा करताना ती मनोभावे आणि भावभक्तीने करावी.
- दररोज शिवलिंगावर गंगाजल, दूध, मध, बेलपत्र आणि राखेने अभिषेक करा.
- "ओम नमः शिवाय" हा शिव मंत्र जप करा.
- श्रावणात सोमवार खूप फलदायी मानले जातात.
- अविवाहित मुली चांगला वर मिळविण्यासाठी उपवास करतात, जर अविवाहित मुलींना चांगला वर हवा असेल तर त्यांनी श्रावण सोमवारी उपवास करावा.
- सात्विक अन्न खावे.
- गरिबांना दान करावे.
- भगवान शिवाची स्तुती, आरती, शिवमहिम्ना स्तोत्र, रुद्राष्टक इत्यादींचे पठण करा.












Click it and Unblock the Notifications