Shiv Jayanti 2025 wishes : शिवजयंतीनिमित्त आपल्या प्रियजनांना पाठवा हे खास मराठी शुभेच्छा संदेश

Shiv Jayanti 2025 wishes : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रसह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जपणारे आणि त्यांच्यावर प्रेम करणारे लोक या दिवशी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करतात. ठिकठिकाणी ढोल ताशाच्या गजरात महाराजांची मिरवणूक काढली जाते. तसेच महाराजांच्या गड किल्ल्यांवर जाऊन कोणी स्वच्छता करतात तर कोणी आनंद उत्सव साजरा करतात.

शिवजयंतीच्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला शिवजयंती शुभेच्छा दिसून येतात. या निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास शुभेच्छा संदेश, व्हॉट्सअप मेसेज, स्टेट्‍स, कोट्स आपल्या मित्र परिवार, नातेवाईक आणि आपल्या प्रियजनांना लोकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा पाठवा.

shiv jayanti 2025

प्रौढ प्रताप पुरंदर
क्षत्रिय कुलावतंस
सिंहासनाधी श्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा!

अंधार फार झाला आता दिवा पाहिजे
अफजल खान फार झाले
आता एक जिजाऊंचा शिवा पाहिजे
शतकांच्या यज्ञातून उठली एक ज्वाला
दाही दिशांच्या तेजातून अरुणोदय झाला!
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा!
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Shiv Jayanti 2025

जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

किती राजे आले आणि किती राजे गेले
पण तुमच्या सारखे कोणी नाही...
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

एक मराठा लाख मराठा
सर्व शिवभक्तांना
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

प्राणपणाने लढून राजा तूच जिंकले किल्ले,
शत्रूंना सदा परतून तूच लावले हल्ले
धर्म रक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी-कोटी.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !

Shiv Jayanti 2025

ताठ होतील माना..
उंच होतील नजरा...
या रयतेच्या राजाला..
मानाचा मुजरा.
शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !

नाही जातीपातीत अडकला माझा दैवत होता उदार
अठरा बगड जाती हाताशी दिले मावला नाव शूर-वीर
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा!

श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग
देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+