हवेतून उडून जाता येईल या गावांतून त्या गावाला... या शहरांत लवकर सुरु होईल 'एअर टॅक्सी'; वाचा डिटेल्स
एरोस्पेस स्टार्टअप सरल एव्हिएशन लवकरच देशातील मोठ्या शहरांमध्ये एअर टॅक्सींचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू करणार आहे. कंपनीने प्रथम बेंगळुरूमध्ये ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर ही सेवा मुंबई- दिल्ली सारख्या इतर प्रमुख शहरांमध्ये देखील विस्तारित केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.

पाच वर्षांत होणार विस्तार
या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत झालेल्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये कंपनीने आपली एअर टॅक्सी प्रदर्शित केली होती. आता सरल एव्हिएशनने बेंगळुरूमध्ये लाँच केल्यानंतर काही महिन्यांनी मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये इलेक्ट्रिक एअर टॅक्सी सुरू करण्याची योजना आखली आहे. कंपनीचे ध्येय ५ वर्षांत देशभरात एअर टॅक्सी सेवांचा विस्तार करण्याचे आहे, असे कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक एड्रियन श्मिट यांनी सांगितले.
काय म्हणतेय सरल कंपनी?
सरल कंपनीचे सीईओ आणि सह-संस्थापक एड्रियन श्मिट म्हणाले की, एअर टॅक्सीचा त्यांचा पहिला प्रोजेक्ट प्रथम बेंगळुरूमध्ये सुरू केला जाईल. त्यानंतर पुढील काही वर्षांत मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल.
कशी आहे कंपनी?
या कंपनीने गेल्या जानेवारीत २० कर्मचाऱ्यांसह सुरूवात केली. सरला एव्हिएशन कंपनी २०२८ पर्यंत देशभरात हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या वेगाने वाढवत आहे. कंपनीने जानेवारीमध्ये २० कर्मचाऱ्यांसह सुरुवात केली होती आणि आता ती ४७ पर्यंत वाढली आहे आणि श्मिट म्हणतात की वर्षाच्या अखेरीस ८०-१२० कर्मचारी संघात जोडले जातील.
फ्लिपकार्ड- स्विगीची गुंतवणूक
१० दशलक्ष डॉलर्स निधी कंपनीने अलीकडेच अॅक्सेलच्या नेतृत्वाखालील सिरीज ए फंडिंग राउंडमध्ये १० दशलक्ष डॉलर्स उभारले. फ्लिपकार्टचे बिन्नी बन्सल, स्विगीचे श्रीहर्ष मजेटी आणि इतर प्रमुख एंजेल गुंतवणूकदारांनीही यात गुंतवणूक केली आहे. श्मिट यांनी असेही स्पष्ट केले की कंपनीचे मुख्य ध्येय केवळ सेवा प्रदाता नसून उत्पादन कंपनी बनणे आहे. ते इतर कंपन्यांना इलेक्ट्रिक एअर टॅक्सी पुरवण्यास देखील तयार आहेत.
भाडे किती असेल?
कंपनीने अद्याप हवाई टॅक्सीच्या भाड्याबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही, परंतु ते म्हणतात की ते परवडणारे बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील जेणेकरून लोक त्यांचा दैनंदिन प्रवास म्हणून वापर करू शकतील. केंद्र सरकार २०२६ पर्यंत एअर टॅक्सी सेवेसाठी पायाभूत सुविधा तयार करण्यावरही काम करत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये eVTOL विमानांसाठी विमान योग्यता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. याव्यतिरिक्त, देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने कॅलिफोर्नियास्थित आर्चर एरोस्पेसकडून २०० हवाई टॅक्सी मागवल्या आहेत.
कशी असेल एअर टॅक्सी?
वेग: २५० किमी प्रतितास उड्डाण
श्रेणी: १६० किमी
क्षमता: ६८० किलो
आसन क्षमता: १ पायलट आणि ६ प्रवासी
प्रणोदन प्रणाली: ७ इलेक्ट्रिक मोटर्स












Click it and Unblock the Notifications