करिश्मा कपूरच्या Ex पतीचं निधन; मागे किती संपत्ती ठेवली? कोणता व्यवसाय करत होते?
Sanjay Kapoor Death & Net Worth in Marathi: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचे पूर्वाश्रमीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती संजय कपूर यांचं 12 जून 2025 च्या रात्री निधन झालं आहे. पोलो खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं वयाच्या 53व्या वर्षी निधन झालं.

खेळादरम्यान अचानक बेशुद्ध झालेल्या संजय कपूर यांना तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले, मात्र त्यांना वाचवता आलं नाही. संजय कपूर यांच्या अकस्मात मृत्यूने केवळ बॉलिवूड नव्हे, तर संपूर्ण उद्योगजगतात मोठा शोककळा पसरला आहे. जाणून घेऊया ते कोणता व्यवसाय करत होते आणि त्यांनी मागे किती संपत्ती ठेवली आहे.
संजय कपूर कोणता व्यवसाय करत होते?
संजय कपूर हे Sona BLW Precision Forgings Ltd. (जे Sona Comstar म्हणूनही ओळखले जाते) या कंपनीचे चेअरमन होते. ही कंपनी ऑटोमोटिव्ह कंपोनेंट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात कार्यरत आहे. संजय कपूर यांचा व्यवसाय केवळ यापुरता मर्यादित नव्हता - रिअल इस्टेटमध्येही त्यांचा मोठा गुंतवणूक पोर्टफोलिओ होता.
भारतीय उद्योग परिसंघाचे (CII) अध्यक्ष
संजय कपूर हे ACMA (ऑटो कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन) चे माजी अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते प्रसिद्ध दून स्कूलचे विश्वस्त (ट्रस्टी) होते. याशिवाय, संजय कपूर यांची नुकतीच भारतीय उद्योग परिसंघ (CII) च्या उत्तर विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
त्यांनी उत्तर भारतातील सात राज्यांमध्ये जसे की, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये चंदीगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख CII नॉर्थ सेक्टर चे नेतृत्व करण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं.
संजय कपूर यांची एकूण संपत्ती किती?
संजय कपूर यांनी आपल्या मागे अब्जोंची संपत्ती ठेवली आहे. बकिंघम युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदवी घेतली होती.
फोर्ब्स 2025 च्या अहवालानुसार त्यांची एकूण संपत्ती 1.1 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती. रिअल-टाईम बिलियनेयर्स इंडेक्सनुसार संजय कपूर यांच्याकडे 1.18 अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती होती, तर ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार ती 1.15 अब्ज डॉलर्स होती.त्यांच्याकडे दिल्ली, मुंबई आणि लंडनमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचंही सांगितलं जातं.
करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट
संजय कपूर यांना शाही आयुष्य जगण्याची आवड होती. पोलो हा त्यांचा आवडता खेळ होता. 2003 मध्ये संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांचा विवाह झाला होता. मात्र, 2016 मध्ये दोघांचा अधिकृत घटस्फोट झाला. दिल्ली उच्च न्यायालयाने 2005 मध्ये त्यांना समुपदेशन घेण्याचा सल्ला दिला होता. पण 2014 मध्ये त्यांनी आपली वैवाहिक नाती संपवण्याचा निर्णय घेतला आणि घटस्फोटासाठी अर्ज केला.
त्यांना दोन अपत्यं आहेत. समायरा आणि किआन, जे सध्या करिश्मा कपूरसोबत राहतात.
-
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोटनिवडणुकीची तयारी; मतदार यादी जाहीर, 'बिनविरोध'साठी हालचाली! -
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!









Click it and Unblock the Notifications