Sambhaji Maharaj: झुकले नाही डोळे त्यांचे असा शिवबाचा..!,शंभुराजेंच्या जयंतीनिमित्त पाठवा शुभेच्छा!
Sambhaji Maharaj Jayanti 2025 : दरवर्षी तारखेनुसार आणि तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराजांची जयंती सोहळा साजरा केला जातो. 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांची तारखेनुसार जयंती असून, यानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून राजेंना विनम्र अभिवादन केले जाते. आजच्या या शुभदिनी तुम्ही शुभेच्छा संदेश व व्हाट्स्अप स्टेट्स ठेऊन छत्रपती शंभुराजांना विनम्र अभिवादन करा अन् शुभेच्छा संदेश पाठवून राजांचे स्मरण करायला विसरू नका.
स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे राजी साजरी करण्यात येत आहे. मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे शिवाजीराजे भोंसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी पुण्याजवळील पुरंदर किल्ल्यावर झाला.
मॉसाहेब जिजाऊंनी केले संगोपन..!
संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे पहिले शासक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची पहिली पत्नी सईबाई यांचे पुत्र होते. सईबाईंच्या मृत्युनंतर त्यांचे संगोपन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई मॉसाहेब जिजाऊ यांनी केले. कधीही लढाई न हारणारा राजा आणि दुश्मनांच्या तोंडचे पाणी सोडणारा राजा म्हणून छत्रपती संभाजीराजे यांना ओळखले जाते.

शुभेच्छा संदेश पाठवून छत्रपती संभाजीराजेंना करा मानाचा मुजरा..!
छत्रपती जाहला राजा,
अभिमान मर्द मराठ्या छातीला!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त
त्यांच्या शौर्याला त्रिवार प्रणाम व सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
प्रौढ प्रताप पुरंदर,
महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस्,
सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, महाराज,
श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
दुष्मनांना वाटत होती ज्यांची भीती
असे आमचे संभाजी राजे 'छत्रपती'
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान
छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम

मृत्यूलाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा,
झुकले नाही डोळे त्यांचे असा शिवबाचा छावा.
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा
शृंगार होता संस्कारांचा
अंगार होता हिंदवी,
स्वराज्याचा, शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा
छत्रपती संभाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन!
रूद्राचा अवतार
वाघाचा ठसा होता
अरे, सह्याद्रीला विचारा त्या
माझा शंभूराजा कसा होता!
इतिहासात एक पराक्रमी योद्धा,
राजकारणीस साहित्यिक व रसिक
असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं
ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे!
छत्रपती शंभुराजेंना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
महत प्रतापी शिवरायांचा शूरवीर छावा,
वंदन करितो बलिदानाला जय 'शंभूराया'
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन!
मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर।
फुटले स्वनेत्र, तुटले जरी जीभशीर।।
दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा।
म्हणुनी उरात धरुया शिवसिंहछावा।।
छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन!
-
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!








Click it and Unblock the Notifications