बदल अनिवार्य : 1 मार्चपासून सामान्यांच्या खिशावर पडणार ताण; गॅस, व्याजदर अनेक ठिकाणी होणार बदल?
या वर्षांचा फेब्रुवारी महिला उद्या म्हणजेच शुक्रवारी संपणार आहे. मार्च महिन्यापासून सरकारच्या काही नियमांत बदल होणार आहे. यामध्ये मुदत ठेवी आणि एफडीवरील व्याजदरातील बदलांपासून अनेक प्रमुख नियमांचा समावेश आहे. हे असे नियम आहेत जे तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात. तर मग कोणते बदल होत आहेत आणि त्याचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होईल ते आपण पाहू...

एफडीवरील व्याजदरात बदल
मार्च 2025 पासून बँकांनी एफडीवरील व्याजदरात काही बदल करण्यात आले आहेत. व्याजदर वाढू किंवा कमी होऊ शकतात. आता बँका त्यांच्या तरलता आणि निधीच्या गरजेनुसार व्याजदरांमध्ये लवचिकता बाळगू शकतात. नवीन दरांमुळे लहान गुंतवणूकदारांवर, विशेषतः ज्यांनी 5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी काळासाठी एफडी ठेवली आहे, त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो.
एलपीजी किंमत बदलणार?
तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतींचा आढावा घेतात. अशा परिस्थितीत, 1 मार्च 2025 रोजी सकाळी तुम्हाला सिलिंडरच्या किमतीत बदल दिसू शकतो. तुमच्या गॅस सिलेंडरच्या किंमती कमी होऊ शकतात किंवा त्या काही रुपयांनी वाढूही शकतात. हे सर्वस्वी तेल कंपन्यांच्या नफ्या-तोट्यावर अवलंबून असेल. मात्र यंदा गॅसच्या किंमतीत बदल होतील, अशी शक्यता काहींनी व्यक्त केली आहे.
एटीएफ आणि सीएनजी-पीएनजी दर
दर महिन्याच्या 1 तारखेला, तेल कंपन्या विमान इंधन म्हणजेच एअर टर्बाइन फ्युएल (एटीएफ) आणि सीएनजी-पीएनजीच्या किमती देखील बदलतात. अशा परिस्थितीत, यावेळी काय बदल होतात हे पाहणे बाकी आहे.












Click it and Unblock the Notifications