Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कर्तव्यपथावर अवतरणार भारताचे सामर्थ्य! प्रजासत्ताक दिन सोहळा कुठे पाहाल Live? वेळ आणि नियम वाचा

Republic Day Parade 2026 : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा उद्या, सोमवारी २६ जानेवारी २०२६ रोजी दिल्लीतील ऐतिहासिक 'कर्तव्यपथावर' पार पडणार आहे. भारताची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता आणि तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडवणारा हा सोहळा जगभर आकर्षणाचे केंद्र असतो. यावर्षी युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावावर यामुळे शिक्कामोर्तब होणार आहे.

Republic Day Parade 2026

वेळ आणि प्रवेशाची नियमावली

  • प्रवेशाची वेळ: प्रेक्षकांसाठी प्रवेशद्वारे सकाळी ७:०० वाजल्यापासून उघडली जातील.
  • संचलनाची वेळ: सकाळी ९:३० वाजता संचलनाला (Parade) प्रत्यक्ष सुरुवात होईल.
  • सूचना: सुरक्षा तपासणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर कार्यक्रमस्थळी पोहोचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कुठे पाहाल थेट प्रक्षेपण?

  • ज्यांना तिकीट मिळाले नाही, ते नागरिक घरी बसूनही या सोहळ्याचा आनंद घेऊ शकतात:
  • दूरदर्शन (DD National): टीव्हीवर थेट प्रक्षेपण.
  • यूट्यूब चॅनेल्स: दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ, PIB आणि MyGov च्या अधिकृत चॅनेलवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.

प्रवेशासाठी कडक सुरक्षा आणि नियम

प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संचलनासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी काही कडक नियम लागू आहेत.

ओळखपत्र अनिवार्य: ज्यांनी ऑनलाइन किंवा ऑफलाइन तिकीट बुक केले आहे, त्यांनी बुकिंग वेळी वापरलेले मूळ सरकारी ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड इ.) सोबत ठेवणे बंधनकारक आहे.

प्रतिबंधित वस्तू: कोणत्याही प्रकारच्या बॅगा, खाऊचे पदार्थ, पेये, इलेक्ट्रॉनिक उपकरणे (पॉवर बँक, कॅमेरा, टॅब्लेट), तीक्ष्ण वस्तू आणि छत्र्या नेण्यास सक्त मनाई आहे.

मोबाईल: वैयक्तिक वापरासाठी मोबाईल फोन नेण्याची परवानगी आहे.

वाहतूक आणि प्रवासाच्या सूचना

  • इंडिया गेट, कर्तव्यपथ आणि विजय चौक परिसरातील रस्ते सामान्य वाहतुकीसाठी बंद राहतील.
  • खाजगी वाहनांना संचलन मार्गाजवळ परवानगी नसल्याने प्रवासासाठी दिल्ली मेट्रोचा वापर करणे सर्वात सोयीचे ठरेल. प्रजासत्ताक दिनी मेट्रोच्या विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+