Republic Day 2025 : तुमच्या मित्र परिवाराला व्हाट्सअपद्वारे पाठवा प्रजासत्ताक दिनाच्या खास शुभेच्छा
26 जानेवारी अर्थात भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. ब्रिटिश राजवटीपासून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान मांडले. संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले व 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. यादिनाचे औचित्य साधून प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा खास शुभेच्छा, शेअर करा WhatsApp, Facebook च्या माध्यमातून खालील संदेश.
- उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला... प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
गर्वाने बोलू भारतीय आहे मी,
देशातील टिकवूनी शांतता,
बदल घडवू, माणूसकी जपू,
आहोत एक आम्ही जरी देशात विविधता
प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे,
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना शुभेच्छा!
लहरतो आहे तिरंगा अभिमानाने
उंच आज या आकाशी
उजळत ठेवू सारे रंग त्याचे घेऊ प्रण हा मनाशी
प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
वीरांच्या बलिदानाची ही कहाणी आहे,
वीरगती मिळालेल्या पुत्रांची निशाणी आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रजासत्ताक दिनाच्या प्रेममय शुभेच्छा!












Click it and Unblock the Notifications