Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय सांगता..? एक, दोन नाही तर मार्चमध्ये बँकांना 14 दिवस सुट्ट्या; पटापट पाहून घ्या सुट्यांची यादी

रिझर्व्ह बँकेने मार्च महिन्यांतील सुट्ट्यांचे कॅलेंडर नुकतेच जाहीर केले. मार्च महिन्यात किती दिवस बँका बंद राहतील, हे सर्वसामान्य ग्राहकाला माहित असणे आवश्यक आहे. कारण या महिन्यात एक-दोन दिवस नाही, तर १४ दिवस भारतातील बँका बंद राहणार आहेत. हे लक्षात घेऊन, आम्ही तुमच्यासोबत मार्च महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी शेअर करत आहोत. या सुट्ट्यांमध्ये आठवड्याच्या सुट्ट्या, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारसह राज्य-विशिष्ट सणांचा समावेश आहे. राज्य-विशिष्ट सणांच्या काळात, बँका फक्त संबंधित राज्यांमध्ये बंद राहतील.

List of Bank Closures

मार्चमध्ये बँका इतके दिवस बंद

२ मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी
मार्च (शुक्रवार): चापचर कुट (मिझोरममध्ये बँका बंद)
८ मार्च (दुसरा शनिवार): साप्ताहिक सुट्टी
९ मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्
१३ मार्च (गुरुवार): होलिका दहन/अट्टुकल पोंगळा (उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, केरळमध्ये बँका बंद)
१४ मार्च (शुक्रवार): होळी (त्रिपुरा, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, मणिपूर, केरळ, नागालँड वगळता देशभरातील बँका बंद)
१५ मार्च (शनिवार): होळी (अगरतळा, भुवनेश्वर, इम्फाळ, पटना येथे बँका बंद)
१६ मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी
२२ मार्च (चौथा शनिवार): साप्ताहिक सुट्टी
२३ मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी
२७ मार्च (गुरुवार): शब-ए-कद्र (जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद)
२८ मार्च (शुक्रवार): जुमात-उल-विदा (जम्मू आणि काश्मीरमध्ये बँका बंद)
३० मार्च (रविवार): साप्ताहिक सुट्टी
३१ मार्च (सोमवार): रमजान-ईद (ईद-उल-फित्र) (मिझोरम आणि हिमाचल प्रदेश वगळता देशभरात बँका बंद)

डिजिटल बँकिंगचा पर्याय उपलब्ध

बँक बंद असली तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. डिजिटल बँकिंग, UPI, IMPS आणि नेट बँकिंग सारख्या सुविधा वापरून तुम्ही तुमची आर्थिक कामे सहजपणे पूर्ण करू शकता. बँकेच्या ऑनलाइन सेवा नेहमीच उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्ही वेबसाइटला भेट देऊनही तुमचे काम करू शकता. जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर एटीएम नेहमीच उपलब्ध असतात. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे डिजिटल पेमेंट देखील करू शकता. नेट बँकिंग २४ तास उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही बँकेच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+