पवित्र रमजान महिना 18 की 19 फेब्रुवारी? भारतात पहिला रोजा कधी? जाणून घ्या 'सहरी' आणि 'इफ्तार'ची वेळ
Ramadan 2026 When is the First Roza in India : इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे. आत्मशुद्धी आणि अल्लाहच्या उपासनेसाठी समर्पित असलेल्या या महिन्याची तारीख चंद्राच्या दर्शनावर (हिलाल) अवलंबून असते. यंदा भारतात पहिला रोजा १९ फेब्रुवारी (गुरुवार) रोजी असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तारीख १८ की १९? काय सांगते खगोलशास्त्रीय गणना?
खगोलशास्त्रीय गणनेनुसार, जर १८ फेब्रुवारी (बुधवार) रोजी संध्याकाळी आकाशात चंद्र दिसला, तर भारतात रमजानचा पहिला रोजा १९ फेब्रुवारी रोजी ठेवला जाईल. मात्र, जर बुधवारी चंद्र दिसला नाही, तर शाबान महिना ३० दिवसांचा पूर्ण होऊन पहिला रोजा २० फेब्रुवारी (शुक्रवार) रोजी असेल. अंतिम तारीख ही चंद्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.
रमजान महिन्याचे महत्त्व
कुराणचे अवतरण: इ.स. ६१० मध्ये याच महिन्यात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर पवित्र 'कुराण शरीफ' नाजिल (अवतरित) झाले होते.
रोजाचे नियम : रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर वाईट पाहणे, वाईट ऐकणे आणि वाईट बोलण्यापासून दूर राहून स्वतःवर ताबा मिळवणे होय.
तरावीह आणि जकात : या महिन्यात रात्रीच्या वेळी विशेष नमाज 'तरावीह' पठण केली जाते. तसेच गरिबांना दान (जकात) देण्याला मोठे महत्त्व आहे.
प्रमुख शहरांनुसार 'इफ्तार'ची वेळ (अंदाजित)
इफ्तारची वेळ ही सूर्यास्तावर अवलंबून असते, त्यामुळे प्रत्येक शहरात ती काही मिनिटांच्या फरकाने बदलते.
शहर, इफ्तार (संध्याकाळी)
- मुंबई : ६.५२ PM
- पुणे : ६.४८ PM
- हैदराबाद : ६.३० PM
- दिल्ली : ६.३८ PM
- अहमदाबाद : ६.५५ PM
- चेन्नई : ६.२१ PM
- कोलकाता : ५:५१ PM
- कानपूर : ६:२५ PM
(टीप: सहरी आणि इफ्तारच्या वेळेत सूर्योदय आणि सूर्यास्तानुसार स्थानिक पातळीवर बदल संभवतात. अचूक वेळेसाठी स्थानिक मशिदीच्या वेळापत्रकाचा संदर्भ घ्यावा.)
महिन्याचा शेवट 'ईद-उल-फितर'ने
संपूर्ण महिनाभर कडक उपवास (रोजा) केल्यानंतर या महिन्याचा शेवट 'ईद-उल-फितर' म्हणजेच मीठी ईदने होतो. या दिवशी शिरखुर्मा आणि शेवया बनवून आनंद साजरा केला जातो.












Click it and Unblock the Notifications