आनंदाची बातमी! रेल्वेची नियमावली, तिकीट आरक्षणात मोठे बदल! प्रवाशांना 'या' तारखेपासून मिळणार लाभ
Railway rules changes in reservation policy : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वेने आनंदाची बातमी दिली आहे. प्रवाशांसाठी भारतीय रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. आता तिकीट आरक्षणात मोठे बदल झाले आहेत. आता तुम्ही 120 दिवसांऐवजी फक्त 60 दिवस आधीच रेल्वे तिकीट बुक करू शकता, या बदलांमुळे प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.
तिकीट आरक्षण नियमात बदल
17 ऑक्टोबर 2024 रोजी रेल्वे मंत्रालयाने एक नवीन अधिसूचना जारी केलीय, जी लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची आहे. या अधिसूचनेनुसार, आता तुम्ही 120 दिवसांऐवजी फक्त 60 दिवस आधीच तुमचे रेल्वे तिकीट बुक करू शकता. यामुळे प्रवाशांना आरक्षण प्रक्रिया आणखी सोपी होईल.

नवीन नियम - 60 दिवस आधी तिकीट बुकिंग
या नवीन नियमाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत जी बुकिंग्स 120 दिवसांच्या कालावधीमध्ये केली जात होती, ती कायम राहतील. म्हणजेच, जर तुम्ही आधीच तिकीट बुक केले असेल, तर ते रद्द होणार नाही.
तुमचं बुकिंग सुरक्षित आहे
या बदलांमुळे वेटिंग लिस्ट कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर अनुभव मिळेल. दिवसा ताज एक्सप्रेस आणि इतर काही गाड्यांमध्ये याचा काहीही परिणाम होणार नाही. पण, परदेशी पर्यटकांसाठी मात्र हे नियम लागू होणार नाहीत. त्यांच्यासाठी आधीप्रमाणेच 365 दिवस आधी तिकीट बुक करण्याची सुविधा सुरूच राहील. तसेच काही विशेष गाड्यांसाठी आरक्षणाची वेळ कमीच राहील.
या नियमांच्या बदलांमागे रेल्वेचं एकच उद्दिष्ट आहे ते म्हणजे प्रवाशांसाठी तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करणं. रेल्वे प्रशासनाने याआधी बेकायदेशीर तिकीट विक्रेत्यांविरोधात अनेक कडक मोहीम राबवल्या आहेत. आणि आता ही नवी नियमावली आणून सर्व प्रवाशांना समान संधी दिली जाणार आहे.
प्रवास होणार सुखकर
रेल्वेच्या या नवीन नियमांमुळे तुमच्या प्रवासात मोठे बदल होणार आहेत, आणि ते कसे तुम्हाला फायदेशीर ठरतील हेही आता जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या बदलांना तयार राहून आपल्या प्रवासाचे आणखी सोयीस्कर नियोजन प्रवाशांना करता येणार आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही आनंदवार्ता रेल्वे प्रशासनाने आपल्या प्रवाशांसाठी दिली आहे. अनेक दिवसांपासून ही मागणी रेल्वेप्रवाशांनी लावून धरली होती आता या मागणीला मुर्त स्वरुप प्राप्त झाले आहे.












Click it and Unblock the Notifications