भारत-रशिया मैत्रीचा नवा अध्याय; पुतिन यांचे भारतात आगमन, मोदींनी केले स्वागत, एकमेकांना मारली मिठी!

Putin India Visit 2025 : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यावर अमेरिका आणि चीनसह संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. या दौऱ्यामुळे भारत आणि रशियाच्या संबंधांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

Putin India Visit 2025

विमानतळावर जिव्हाळ्याचे स्वागत

पुतिन यांचे दिल्लीतील पालम विमानतळावर आगमन होताच, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या स्वागतासाठी ताफ्यासह पोहोचले होते. पुतिन यांचे लाल कार्पेट अंथरून भव्य स्वागत करण्यात आले. विमानतळावर उतरल्यावर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींशी केवळ हस्तांदोलनच केले नाही, तर त्यांना अत्यंत जिव्हाळ्याने मिठी मारली.

दोन्ही नेत्यांमधील ही जिव्हाळ्याची केमिस्ट्री पुन्हा एकदा जगासमोर आली. अलीकडेच चीनमधील टियांजिन येथे झालेल्या भेटीतही दोन्ही नेत्यांमधील मैत्री पाहून अनेक देशांना आश्चर्य वाटणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंतप्रधान मोदी आणि पुतिन हे एकाच गाडीतून विमानतळावरून पुढे रवाना झाले.

Putin India Visit 2025

उच्चस्तरीय भेट आणि डिनरचे आयोजन

पुतिन सुमारे ३० तास भारतात राहणार आहेत. या दरम्यान, पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी त्यांच्या सन्मानार्थ एका खासगी डिनरचे आयोजन करणार आहेत, ज्यात दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे. पुतिन यांच्या दौऱ्यापूर्वीच अनेक महत्त्वाचे रशियन मंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत, ज्यात पुढील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. उपपंतप्रधान डेनिस मंटुरोव, संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु, कृषी मंत्री दिमित्री पेट्रोव्ह, या उच्चस्तरीय भेटींमुळे संरक्षण, व्यापार आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, अशी अपेक्षा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+