मराठी-कन्नड वाद : बससेवा बंदच; आता बेळगाव कृती समितीने उकरुन काढला हा नवा वाद
कन्नडमध्ये बोलण्यास सांगितल्याबद्दल काही मराठी तरुणांनी बस कंडक्टरवर हल्ला केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील बसवरही कर्नाटकात हल्ला झाला होता. मराठी-कन्नड हा भाषावाद तिव्र झाल्यानंतर आता एक नवीन मुद्दा समोर आला आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीत अधिसुचना प्रसिद्ध करु नये, यासाठी कन्नड कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहल्याचे समजते. विशेष म्हणजे बेळगावचे जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीत अधिसूचना जारी करण्याचे आदेश दिल्याचे काही मराठी दैनिकांनी म्हटले होते. त्यानंतर कन्नड कृती समिती आक्रमक झाल्याचे सांगितले जाते.

नेमका वाद काय?
मराठी-कन्नड हा भाषावाद गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. सुरुवातीला कन्नड येथील एका बसचालकाला मराठीच्या मुद्यावरुन मारहाण झाली. त्यानंतर कोल्हापूर डेपोच्या एका एसटी बसचालकाला काळे फासून बेळगावात मारहाण करण्यात आली. आता या सगळ्या प्रकारानंतर बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगावात मराठीत अधिसूचना काढली जाईल, असे आश्वासन दिल्याचे काही मराठी वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आता कन्नड कृती समिती आक्रमक झाली आहे.
कन्नड समर्थक संघटनांचा निषेध
कन्नड कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात कृती समितीने असा दावा केला आहे की कर्नाटक सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड भाषिक लोकांनी मराठी शिकून स्थानिक संस्कृतीशी जुळवून घेतले असले तरी, कर्नाटकातील मराठी भाषिक लोकांसोबत असे घडत नाही. महाराष्ट्रात नामफलकांवर मराठीशिवाय इतर कोणत्याही भाषेला परवानगी नाही. महाराष्ट्र समर्थित संघटनांच्या मागण्यांपुढे सरकारने झुकू नये, असे पत्रात म्हटले आहे. राज्य पुनर्रचनेच्या ६८ वर्षांनंतरही, येथील मराठी भाषिक अल्पसंख्याक अजूनही आपली राज्यभाषा, कन्नड शिकण्यास आणि मुख्य प्रवाहात सामील होण्यास कचरत आहेत," असेही पत्रात म्हटले आहे.
बस सेवा थांबली
दरम्यान, बेळगाव सीमेवरून कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यानची बससेवा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. राज्य पोलिसांच्या सूचनांनुसार, कर्नाटकहून येणाऱ्या बसेस फक्त निप्पानी तालुक्यातील (कर्नाटक-महाराष्ट्र सीमा) कोगनोल्लीपर्यंत जात आहेत. बेळगावहून दररोज सुमारे ९० बसेस महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये जातात. २१ फेब्रुवारी रोजी मराठी तरुणांच्या एका गटाने बस कंडक्टर महादेव यांना एका प्रवाशाला कन्नडमध्ये बोलण्याची विनंती केल्यानंतर मारहाण केल्याचा आरोप आहे. एका तरुणीने मराठीत दोन बस तिकिटे मागितली तेव्हा हा वाद सुरू झाला आणि महादेव यांना भाषा समजत नसल्याने त्यांनी तिला कन्नडमध्ये संवाद साधण्यास सांगितले. यामुळे संतप्त झालेल्या या गटाने बालेकुंद्रीजवळ चालती बस थांबवली आणि महादेववर हल्ला करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात कंडक्टर जखमी झाला आणि त्याला ताबडतोब बेळगावातील रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले. या घटनेनंतर चित्रदुर्ग जिल्ह्यात तणाव वाढला, जिथे कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कन्नड कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री आयमंगळा टोल गेटजवळ महाराष्ट्र बस आणि तिच्या चालकावर काळी शाई फेकली.












Click it and Unblock the Notifications