केरळातील भुसख्खलनावर पीएम नरेंद्र मोदी, राहूल गांधींचे मोठे वक्तव्य, म्हणाले- आम्ही व्यथित झालोय

मुंबई - केरळात घडलेल्या भीषण दुर्घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी अतिव दुखः व्यक्त केलं आहे. अवघ्या दोन तासांत तीन भुसख्खलन झाले. त्यात सुमारे आठ जणांचा बळी गेला असून शंभरापेक्षा अधिक लोक गाडले गेल्याची भीती आहे. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारही तातडीच्या उपाययोजना हाती घेत आहे.

वेगाने मदतकार्य, आणखी पाऊस पडणार

केरळात जोरदार पाऊस सुरु असून आगामी चोवीस तासात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान भुसख्खलामुळे जमिनीत गाडलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे कार्य वेगाने सुरु आहे. यातील काही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुख्यमंत्री पी. विजयन हेही लक्ष ठेवून आहेत.

PM Narendra Modi Rahul Gandhi on Kerala wayanad landslide accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट

"वायनाडच्या काही भागात भूस्खलनामुळे व्यथित. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांप्रती दुखः व्यक्त करतो आणि जखमींसोबत प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांना सद्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे."

मी व्यथित झालोय..- राहूल गांधी

"वायनाडमधील मेप्पडीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे मी अत्यंत व्यथित झालो आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या शोकसंतप्त कुटुंबांप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. मला आशा आहे की अजूनही अडकलेल्यांना लवकरच सुरक्षित स्थळी आणले जाईल. मी केरळचे मुख्यमंत्री आणि वायनाडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांनी मला आश्वासन दिले की बचाव कार्य सुरू आहे, असे राहूल गांधी म्हणाले.

बचाव, मदत कार्य करा

राहूल गांधी म्हणाले, मी मुख्यमंत्री विजयनन यांना विनंती केली आहे की. त्यांनी सर्व एजन्सींशी समन्वय राखावा, एक नियंत्रण कक्ष स्थापन करावा आणि मदत कार्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मदतीची आम्हाला माहिती द्यावी. मी केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि त्यांना वायनाडला शक्य ती सर्व मदत देण्याची विनंती करेन. मी सर्व UDF कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला बचाव आणि मदत कार्यात मदत करण्याचे आवाहन करतो."

युद्धपातळीवर बचावकार्य - अमित शहा

"केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाच्या घटनांमुळे चिंतेत आहे. एनडीआरएफ युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य करत आहे. दुसरी टीम रिस्पॉन्स ऑपरेशनला आणखी मजबूत करण्याच्या मार्गावर आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+