उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले - 'अनेक भूमिकां..
PM narendra Modi on Vice President Jagdeep Dhankhad : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी संध्याकाळी उशिरा आरोग्याच्या कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर केलेल्या राजीनाम्यात त्यांनी संविधानाच्या कलम 67 (A) चा हवाला देत म्हटले आहे की, आरोग्याला प्राधान्य देऊन आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी तात्काळ भारताच्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला. तर राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट X वर त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी धनखड यांच्या कार्याविषयी कौतुक केले.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकाऊंटवरून जगदीप धनखड यांच्याविषयी महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, ''श्री जगदीप धनखड जी यांना भारताच्या उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये देशाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो.''
Shri Jagdeep Dhankhar Ji has got many opportunities to serve our country in various capacities, including as the Vice President of India. Wishing him good health.
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2025
श्री जगदीप धनखड़ जी को भारत के उपराष्ट्रपति सहित कई भूमिकाओं में देश की सेवा करने का अवसर मिला है। मैं उनके उत्तम…
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत काय म्हणाले?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना, शिवसेनेचे (उद्धव गट) ज्येष्ठ नेते संजय राऊत म्हणाले, "पडद्यामागे बरेच काही घडत आहे. दिल्लीचे राजकारण एका मोठ्या बदलाकडे वाटचाल करत आहे." राऊत यांनी जगदीप धनखड यांच्या निर्णयाला असामान्य म्हटले.
ते म्हणाले, "धनखडजींचा राजीनामा ही सामान्य घटना नाही. मी त्यांना चांगले ओळखतो. ते मैदान सोडणारे व्यक्ती नाहीत, तर लढणारे व्यक्ती आहेत."
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींच्या प्रकृतीबद्दल उपस्थित होत असलेले प्रश्नही फेटाळून लावले. ते म्हणाले, "त्यांची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. मी त्यांना कालच पाहिले." शेवटी, त्यांनी एक संकेत दिला आणि म्हणाले, "सप्टेंबरमध्ये बरेच काही घडणार आहे. फक्त वाट पहा. असे म्हणत राऊत यांनी मोदी सरकारवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
हे ही वाचा : जगदीप धनखड यांचा राजीनामा, आता उपराष्ट्रपती पदाची सूत्रे कोणाकडे, कशी असती निवड प्रक्रिया?
पंतप्रधान मोदींना लिहिलेले पत्र
उपराष्ट्रपती धनखड यांनी त्यांच्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले. ते पुढे म्हणाले, "हे प्रतिष्ठित पद सोडताना, भारताच्या जागतिक उदय आणि त्याच्या अद्भुत कामगिरीबद्दल मला अभिमान वाटतो आणि मला त्याच्या उज्ज्वल भविष्यावर पूर्ण विश्वास आहे.
-
आजचे राशीभविष्य: सोमवार १६ मार्च २०२६, 'या' राशींना होणार प्रचंड धनलाभ; पाहा तुमची रास! -
LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! गॅस सप्लाय बंद होण्याची भीती वाटतेय? घरबसल्या करा e-KYC 'ही' सोपी पद्धत -
गुढी कशी उभारावी? वाचा शास्त्रोक्त पूजा-विधी, शुभ मुहूर्त, मंत्र आणि आरती; करा नववर्षाचे स्वागत -
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
युद्धाचा भडका! तरीही सोन्याच्या दरात मोठी घसरण! 10 ग्रॅमचा भाव झाला 'एवढा'; पहा मुंबई पुण्याचे दर -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न!










Click it and Unblock the Notifications