अयोध्येत मंदिराच्या शिखरावर PM मोदी फडकवणार धर्म ध्वज! राम मंदिरांची 'हे' 5 वैशिष्ट्य माहीत आहेत का?
PM Modi to Hoist Dharma Dhwaja on Ram Mandir : आज, मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या दौऱ्यावर असून, ते श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर 'धर्म ध्वजा' फडकवून मंदिर निर्माणाचे काम औपचारिकरित्या पूर्ण झाल्याची घोषणा करतील.
दुपारी १२ वाजता होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शेकडो संत-महात्मांसह सुमारे ७,००० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी २२ फूट उंचीचा धार्मिक ध्वज फडकवून या विधींचे नेतृत्व करतील. काशीचे विख्यात विद्वान गणेश्वर शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अयोध्या, काशी आणि दक्षिण भारतातील १०८ आचार्य अनुष्ठान करतील. पंतप्रधान मोदी आज सकाळी १० वाजता राम जन्मभूमी मंदिर परिसरात पोहोचले व त्यांनी रामलल्लाचे दर्शन घेतले यानंतर या ऐतिहासिक सोहळ्याला प्रारंभ झाला.

राम मंदिराची ५ खास आणि प्रमुख वैशिष्ट्ये
भव्य श्रीराम मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर ते भारतीय स्थापत्यकला आणि अभियांत्रिकीचा एक अद्भुत नमुना आहे. या मंदिराची पाच वैशिष्ट्ये आपण जाणून घेऊया.
१. नागर शैलीतील भव्य रचना
मंदिर पारंपारिक 'नागर शैली' स्थापत्यकलेनुसार डिझाइन केलेले आहे, जी उत्तर भारतीय मंदिरांची ओळख आहे. मंदिराची लांबी सुमारे ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे.
२. लोखंडाचा वापर नाही
राम मंदिराच्या संपूर्ण बांधकामात लोखंडाचा (Iron) किंवा स्टीलचा वापर केलेला नाही. मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगड, तांबे आणि ग्रॅनाईट यांसारख्या टिकाऊ साहित्याचा वापर करून केले गेले आहे, ज्यामुळे त्याची आयुर्मान हजारो वर्षांचे असेल.
३. भूकंपांपासून सुरक्षित
राम मंदिर इतक्या मजबूत पद्धतीने बांधले आहे की ते १००० वर्षांपर्यंत टिकेल. तसेच, ते मोठे भूकंप सहन करण्याच्या क्षमतेनुसार डिझाइन केलेले आहे, ज्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी होतो.
४. पाच मंडपांची रचना
राम मंदिराच्या मुख्य शिखरावर धर्म ध्वजा फडकवली जात असतानाच हेही लक्षात घ्यायला हवे की राम मंदिरात एकूण ५ मंडप आहेत. यामध्ये नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन या मंडपाचा समावेश आहे.
५. पर्यावरणास अनुकूल मंदिराची बांधणी
राम मंदिराच्या बांधकामात पर्यावरणाचे विशेष भान राखले गेले आहे. संपूर्ण मंदिर परिसरात ७० एकर जागा असून, त्यातील ७० टक्के जागा हिरवळ आणि निसर्गरम्यतेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.












Click it and Unblock the Notifications