Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

13 वर्ष CM, 11 वर्ष PM असलेल्या पंतप्रधान मोदींची संपत्ती ऐकून व्हाल थक्क! मोदींकडे काय नाही हे वाचा

Pm Modi Net Worth in Marathi : देशाच्या इतिहासात सत्ताकाळात असलेल्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढे आहेत. पाच दहा नव्हे तब्बल २४ वर्ष ते सत्तेत आहेत. परदेश यात्रेचा विक्रम ते प्रेस काॅन्फरन्ससंदर्भात विरोधकांची टीका अशा अनेक गोष्टीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परिचय दिला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातीलच नव्हे तर जगातील बलाढ्य पंतप्रधान असल्याचे द्योतक गेल्या काही वर्षात दिसून आले आहे.

Pm Modi Net Worth in Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज, 17 सप्टेंबर रोजी 75 वा वाढदिवस. देशभर भाजप कार्यकर्ते, पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्यांच्यावर प्रेम करणारे कोट्यवधी लोक विविध कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत. जगभरातील अनेक नेतेही त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातच्या वडनगरमध्ये जन्मलेले मोदी हे स्वतंत्र भारतात जन्मलेले सर्वात प्रभावी आणि पहिले पंतप्रधान आहेत. 2001 ते 2014 पर्यंत सुमारे 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर, 2014 पासून ते भारताचे पंतप्रधान आहेत. 2024 मध्ये ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले.

बलाढ्य पंतप्रधान म्हणून गणना केल्या जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीबद्दलही अनेक समज गैरसमज लोकांना आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे 13 वर्ष मुख्यमंत्री आणि देशाचे 11 वर्ष पंतप्रधान राहीले आहेत. त्यामुळे तेव्हाच्या आणि आताच्या संपत्तीत किती वाढ झाली याची उत्सुकताही लोकांना आहे. खासकरुन पंतप्रधानांना पगार, भत्ते काय असतात हेही अनेकांना माहित नसते, आज आपण यासंदर्भात माहिती घेऊया.

Take a Poll

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आहे एवढी संपत्ती?

वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, जवळपास 24 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीनंतरही मोदींची वैयक्तिक संपत्ती मर्यादित आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती 3.02 कोटी रुपये आहे, तर त्यांच्यावर कोणतीही देयता किंवा कर्ज नाही. या 3 कोटींच्या संपत्तीत 52,920 रुपये रोख रक्कम आहे, मात्र त्यांच्या नावावर कोणतीही जमीन किंवा घर नाही.

कुठे केली आहे गुंतवणूक?

रोख रक्कम: 52,920 रुपये

SBI मध्ये FD आणि व्याज: 2.85 कोटी रुपये

SBI मध्ये बचत: 80,304 रुपये

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र सह व्याज: 9.12 लाख रुपये

दागिने: मोदींकडे अंदाजे 45 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्यांची किंमत 2.67 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

इतर मालमत्तेत यामध्ये 3.33 लाख रुपयांच्या इतर मालमत्तांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदींकडे काय नाही?

पंतप्रधान मोदींच्या नावावर कोणतंही घर, कार, व्यावसायिक इमारत, शेतजमीन, बिनशेती जमीन किंवा इतर कोणतीही जागा नाही. तसेच त्यांच्या नावावर कोणतीही विमा पॉलिसी किंवा वाहन नाही. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्जही नाही.

मोदींच्या शैक्षणिक प्रवास

पंतप्रधान मोदींनी आपलं सुरुवातीचं शिक्षण गुजरात बोर्डातून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निंगमधून राज्यशास्त्रात पदवी (BA) घेतली. गुजरात विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्रात पदव्युत्तर (MA) शिक्षण पूर्ण केलं आहे.

मोदींच्या संपत्तीत गेल्या 18 वर्षांत किती वाढ झाली?

  • 2007 : 42,56,426 रुपये
  • 2012 : 1,33,42,842 रुपये
  • 2014 : 1,26,12,288 रुपये
  • 2015 : 1,41,14,893 रुपये
  • 2016 : 1,73,36,996 रुपये
  • 2017 : 2,00,13,403 रुपये
  • 2019 : 2,51,36,119 रुपये
  • 2024 : 3,02,06,889 रुपये
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+