Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी: पहलगाम हल्ल्यानंतर सौदीचा दौरा अर्धवट सोडून PM मोदी भारतात आले, NSA डोवालसोबत झाली बैठक

PM Modi cuts short Saudi Arabia visit after Pahalgam attack reaches Delhi : पहलगाम, जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश दुःखात असून हा गेल्या एक वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे, अशा स्थितीत आता केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरेबिया दौरा अर्धवट सोडला आहे. ते भारतात परतले असून आज सीसीएसच्या बैठकीत ते सहभागी होत आहेत.

PM Modi cuts short Saudi Arabia visit


22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहेलगाम येथे दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात रक्तपात झाला अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला असून अनेकजण जखमी झाले आहे. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.

Take a Poll

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय

दहशतवादी हल्ला झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. कालच पंतप्रधान मोदींनी सुरक्षाव्यवस्थेचा सौदी अरेबियातून आढावा घेत सूचना केल्या परंतु हा हल्ला खूपच मोठा असल्याने त्यांनी तातडीने मोठा निर्णय घेतला. पंतप्रधान मोदींनी सौदी अरेबियात होणारे सर्व अधिकृत कार्यक्रम अर्धवट सोडून नियोजित वेळेपूर्वी भारतात परतले आहेत.

अलिशान डिनरही रद्द, देशात सकाळी दाखल

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी सौदी अरेबिया सरकारने आयोजित केलेले भव्य डिनरही रद्द केले. आधी ते बुधवारी रात्री परतणार होते, मात्र आता आज 23 एप्रिलला बुधवारी सकाळी ते दिल्लीत पोहचले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी X वर माहिती दिली की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सौदी अरेबियाचा राज्य दौरा पूर्ण केला आहे आणि ते भारताला रवाना झाले आहेत." पहलगाम हल्ला 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाचा दौरा आटोपून भारतात परतत आहेत, ज्यात 26 लोक मारले गेले होते.

कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची एक महत्त्वाची बैठक होणार आहे, ज्यामध्ये मोठा निर्णय अपेक्षित आहे. सुरक्षा दलांनी शोध मोहीम तीव्र केली आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे.

'आम्ही एकत्र दहशतवादाशी लढू, हल्लेखोरांना सोडणार नाही

पंतप्रधान मोदींनी जेद्दाहमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी संवाद साधला आणि दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत वक्तव्य केले आहे. बिन सलमान यांनी पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मृतांप्रती शोक व्यक्त केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना सोडणार नाही असे यापुर्वीच ट्वीट केले आहे.

PM मोदींनी घेतली संक्षिप्त बैठक

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी EAM डॉ. एस. जयशंकर, NSA अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकाऱ्यांसमवेत एक संक्षिप्त बैठक घेतली.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+