पीएम किसानबाबत केंद्राचा मोठा निर्णय! पती-पत्नी दोघांना 2 हजार रुपये मिळणार का? पाहा काय सांगतो नियम
PM Kisan 22nd installment date 2026 husband wife eligibility rules : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे आर्थिक बलस्थान असलेल्या 'प्रधानमंत्री किसान सम्मान निधी' (PM Kisan) योजनेच्या २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपत आली आहे. मात्र, हा हप्ता खात्यात जमा होण्यापूर्वी केंद्र सरकारने नियमांबाबत मोठी स्पष्टोक्ती दिली आहे. विशेषतः एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो का? या प्रश्नावर सरकारने कठोर इशारा दिला आहे.

एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी
अनेक शेतकऱ्यांमध्ये असा समज आहे की, जर पती आणि पत्नी दोघांच्या नावे वेगळी शेती असेल, तर दोघेही २,००० रुपयांच्या हप्त्यासाठी पात्र आहेत. परंतु, सरकारी नियमांनुसार हे पूर्णतः चुकीचे आहे. पीएम किसान योजनेच्या नियमानुसार, एका शेतकरी कुटुंबातून केवळ एकाच व्यक्तीला वार्षिक ६,००० रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते.
जर तपासणीत असे आढळले की, पती आणि पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेत आहेत, तर सरकार त्यांच्यावर कडक कारवाई करू शकते. अशा लाभार्थ्यांना आतापर्यंत मिळालेली सर्व रक्कम सरकारला परत करावी लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
फेब्रुवारीच्या अखेरीस येणार २२ वा हप्ता
अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ व्या हप्त्याची रक्कम फेब्रुवारी २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट (DBT) जमा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचे पैसे अडकू शकतात. शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन स्वतः किंवा जवळच्या CSC केंद्रात जाऊन बायोमेट्रिकद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
तुमचे नाव यादीत असे तपासा
- १. सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- २. 'Know Your Status' या पर्यायावर क्लिक करा.
- ३. तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) प्रविष्ट करा.
- ४. 'Get Details' वर क्लिक करताच तुमच्या हप्त्याची स्थिती स्क्रीनवर दिसेल.
महत्त्वाची टीप: केवळ नाव असून चालणार नाही, तर तुमच्या स्टेटसमध्ये 'Land Seeding' समोर 'Yes' असणे आणि बँक खाते आधारशी लिंक असणे अनिवार्य आहे.












Click it and Unblock the Notifications