PM Awas Yojana Beneficiary list : पंतप्रधान आवास योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही? असे तपासा
PM Awas Yojana Beneficiary list : आपले हक्काचे घर व्हावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे घर बनवण्यासाठी जो-तो झटतो. अहोरात्र परिश्रम करतो. भारत सरकारही पीएम आवास योजनेच्या माध्यमातून तुमच्या स्वप्नांना बळ देत असते. पंतप्रधान आवास योजना (PMAY) ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश देशातील प्रत्येक गरजू कुटुंबाला २०३० पर्यंत पक्के घर उपलब्ध करून देणे आहे.
अनेक लाभार्थी सरकारच्या आवास योजनेसाठी अर्ज करतात पण त्यांना लाभार्थी यादीत नाव आहे की नाही हे अनेकदा माहीत असतेच असे नाही. जर आवास योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुम्ही लाभार्थ्याच्या यादीत आहात की नाही हे तुम्ही काही सोप्या पद्धतींनी तपासू शकता.

पंतप्रधान आवास योजनेचे प्रामुख्याने दोन मुख्य भाग आहेत, यामध्ये पंतप्रधान आवास योजना-शहरी (PMAY-U) आणि पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) या दोन्ही योजनांसाठी यादी कशी तपासावी, याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
शहरी भागातील यादी कशी तपासावी? (PM Awas Yojana Beneficiary list)
- स्टेप १: सर्वात आधी PMAY-U च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- स्टेप २: 'Beneficiary Search' (लाभार्थी शोधा) या पर्यायावर क्लिक करा.
- स्टेप ३: 'Search by Name' (नावाने शोधा) निवडा आणि तुमच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाका.
- स्टेप ४: यादी पाहण्यासाठी 'Show' वर क्लिक करा.
- ग्रामीण भागातील यादी कशी तपासावी?
- स्टेप १: PMAY-G च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- स्टेप २: 'Awaassoft' पर्यायाखालील 'Report' (अहवाल) निवडा.
- स्टेप ३: 'Social Audit Reports' (सामाजिक लेखा परीक्षण अहवाल) मध्ये 'Beneficiary Details' (लाभार्थी तपशील) वर क्लिक करा.
- स्टेप ४: येथे तुमचा जिल्हा, ब्लॉक, राज्य आणि पंचायत निवडा.
- स्टेप ५: तुमचा रजिस्ट्रेशन नंबर अचूक भरा आणि 'Submit' वर क्लिक करा.
'या' मोबाइल ॲपवरही माहिती मिळवता येणार
ज्यांना वेबसाइट वापरणे सोयीचे नाही, ते 'आवासॲप' (AwaasApp) वापरू शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. ॲपमध्ये लॉग इन करून तुम्ही वेबसाइटवर दिल्याप्रमाणेच माहिती भरू शकता आणि तुमच्या अर्जाची स्थिती किंवा यादी तपासू शकता. ग्रामीण भागातील लोकांसाठी, ज्यांच्याकडे संगणक नाही, त्यांच्यासाठी हे ॲप खूप उपयुक्त आहे.
पीएम आवास ग्रामीण PMAY-G योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक खात्याचा तपशील
- उत्पन्नाचा पुरावा
- जागेच्या मालकीची कागदपत्रे
पीएम आवास शहरी PMAY-U साठी आवश्यक कागदपत्रे
- बँक खात्याचा तपशील
- पक्के घर नसल्याचे शपथपत्र
- जागेच्या मालकीची कागदपत्रे












Click it and Unblock the Notifications