Pitru Paksha 2025 : सर्वपित्री अमावस्या कधी?, जाणून घ्या- संपूर्ण तिथी आणि त्याचे महत्त्व!
Pitru Paksha 2025 : हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्ष हा आपल्या दिवंगत पूर्वजांना आदराने आणि श्रद्धेने स्मरण करण्याचा काळ मानला जातो. यावर्षी, 2025 मध्ये पितृपक्ष ७ सप्टेंबरपासून सुरू झाला आहे आणि 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तो संपेल.

पितृपक्षाचे महत्त्व
सनातन धर्मानुसार, पितृपक्षात पूर्वजांचे आत्मे पृथ्वीवर त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी येतात. या काळात केले जाणारे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान त्यांना संतुष्ट करतात. असे मानले जाते की यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो आणि कुटुंबातील सुख-शांती कायम राहते. या १५ दिवसांच्या काळात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दान-धर्म करण्याचे विशेष महत्त्व आहे.
पितृपक्ष 2025 च्या तिथी
खालीलप्रमाणे पितृपक्षाच्या तिथी आहेत
- ७ सप्टेंबर : पौर्णिमा श्राद्ध
- ८ सप्टेंबर : प्रतिपदा श्राद्ध
- ९ सप्टेंबर : द्वितीया श्राद्ध
- १० सप्टेंबर : तृतीया श्राद्ध
- ११ सप्टेंबर : चतुर्थी श्राद्ध
- १२ सप्टेंबर : पंचमी श्राद्ध
- १३ सप्टेंबर : षष्ठी श्राद्ध
- १४ सप्टेंबर : अष्टमी श्राद्ध
- १५ सप्टेंबर : नवमी श्राद्ध
- १६ सप्टेंबर : दशमी श्राद्ध
- १७ सप्टेंबर : एकादशी श्राद्ध
- १८ सप्टेंबर : द्वादशी श्राद्ध
- १९ सप्टेंबर : त्रयोदशी श्राद्ध
- २० सप्टेंबर : चतुर्दशी श्राद्ध
- २१ सप्टेंबर : सर्वपित्री अमावस्या
सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व
पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजेच २१ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या असते, ज्याला महालय अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी असे सर्व पूर्वज ज्यांची मृत्यूची तिथी माहीत नाही किंवा ज्यांचे श्राद्ध कोणत्याही कारणास्तव करता आले नाही, त्यांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. या दिवशी सर्व पितरांना संतुष्ट करण्याचा विधी असतो, म्हणूनच या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते.












Click it and Unblock the Notifications