EPFO कोट्यवधी नोकरदारांना धक्का बसणार? PF वरील व्याजात कपातीची शक्यता; वेज सीलिंगबाबतही मोठा निर्णय?

PF Interest Rate FY 2026 : "देशातील कोट्यवधी पगारदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या EPFO च्या २३९ व्या महत्त्वपूर्ण बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. एकीकडे पीएफवरील (PF) व्याजदरात कपात करून नोकरदारांना धक्का दिला जाऊ शकतो, तर दुसरीकडे वेज सीलिंगची मर्यादा १५ हजारांवरून थेट २५ हजार रुपयांपर्यंत वाढवून सामाजिक सुरक्षेचे कवच विस्तारले जाऊ शकते. या बदलांचा तुमच्या पगारावर आणि भविष्यातील गुंतवणुकीवर नेमका काय परिणाम होणार? पाहा सविस्तर..."

PF Interest Rate FY 2026

..म्हणूनच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) आगामी २३९ व्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज (CBT) च्या बैठकीकडे देशातील कोट्यवधी नोकरदारांचे लक्ष लागले आहे. या महत्त्वपूर्ण बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील (PF) व्याजदरात कपात केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने आता नोकरदारांना हा संभाव्य फटका बसेल अशी शक्यता व्यक्त होत आहे.

१. व्याजदरात घसरण होणार? (८% ते ८.२०% ची शक्यता)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, २०२४-२५ या वर्षासाठी जाहीर केलेला ८.२५% व्याजदर आता २०२५-२६ या वर्षासाठी थोडा कमी करून ८ ते ८.२०% च्या दरम्यान आणला जाऊ शकतो. 'प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने'अंतर्गत मोठ्या संख्येने नवीन सदस्य EPFO शी जोडले गेल्याने, देय रक्कम वाढली आहे. अशा परिस्थितीत निधीचा समतोल राखण्यासाठी व्याजदर घटवण्याचा विचार सुरू आहे.

२. वेज सीलिंग २५,००० रुपये होणार?

या बैठकीतील दुसरा सर्वात मोठा अजेंडा म्हणजे 'वेज सीलिंग' वाढवणे. सध्या ही मर्यादा १५,००० रुपये प्रति महिना आहे, ती वाढवून २५,००० रुपये करण्याची दाट शक्यता आहे.

सुप्रीम कोर्टाचे निर्देश : वाढती महागाई आणि वेतनवाढ लक्षात घेता, सर्वोच्च न्यायालयाने ही मर्यादा वाढवण्याचे निर्देश दिले होते. ही मर्यादा वाढल्यास अधिक कर्मचारी सोशल सिक्युरिटी नेटखाली येतील. मात्र, यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारात घट होऊ शकते आणि पीएफ खात्यातील योगदान वाढू शकते.

३. व्याज खात्यात कधी जमा होणार?

सीबीटीने व्याजदर निश्चित केल्यानंतर त्याला अर्थ मंत्रालयाची मंजुरी लागेल. त्यानंतर श्रम आणि रोजगार मंत्रालय अधिकृत अधिसूचना काढेल. साधारणपणे या वर्षाच्या मध्यापर्यंत व्याजाची रक्कम सभासदांच्या खात्यात जमा केली जाईल.

हेही वाचा : EPFO पीएफ धारक-नोकरदारांना मोठा दिलासा! PF खात्यात चुकलेली नाव किंवा जन्मतारीख मिनिटांत होईल दुरुस्त

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+