भारतीय लष्कराने पाकड्यांचा घुसखोरीचा कट उधळला! LOCवर 5 ड्रोनचा थरार; 'ऑपरेशन सिंदूर' पुन्हा सक्रिय?
Drones spotted in Samba Rajouri Poonch : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचे वातावरण असतानाच, सीमेपलीकडून पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती सुरू केल्या आहेत.
रविवारी संध्याकाळी जम्मू, सांबा, राजौरी आणि पूंछ या भागांत नियंत्रण रेषेजवळ एकामागून एक पाच संशयास्पद ड्रोन दिसल्याने खळबळ उडाली आहे. भारतीय लष्कराने तातडीने प्रत्युत्तरी कारवाई करत शोध मोहीम तीव्र केली आहे.

एकाच संध्याकाळी ५ ड्रोनचा शिरकाव: कुठे काय घडले?
रविवारी संध्याकाळी साधारण 6.30 ते 7.30 च्या दरम्यान विविध सेक्टरमध्ये हे ड्रोन घिरट्या घालताना दिसले.
- राजौरी (नौशेरा सेक्टर): संध्याकाळी ६:३५ वाजता गनिया-कलसियान गावावर ड्रोन दिसताच सतर्क सैनिकांनी मशीन गनद्वारे गोळीबार सुरू केला.
- राजौरी (तेरियाथ) : याच वेळी खब्बर गावातून एक ड्रोन भरखच्या दिशेने उडताना दिसला.
- सांबा (रामगड सेक्टर) : ७:१५ वाजता चक बाबरल गावावर काही मिनिटे एक संशयास्पद वस्तू घिरट्या घालत होती.
- पूंछ (मानकोट सेक्टर) : संध्याकाळी ६:२५ वाजता ताईनहून टोपाकडे ड्रोनची हालचाल नोंदवण्यात आली.
शस्त्रसाठा आणि दहशतवादी कट
सुरक्षा दलांच्या मते, हे ड्रोन केवळ टेहळणीसाठी नसून दहशतवाद्यांना शस्त्रे आणि अंमली पदार्थ पुरवण्यासाठी वापरले जात असावेत.
विशेष म्हणजे, ९ जानेवारी रोजी सांबा सीमेजवळ ड्रोनने टाकलेला मोठा शस्त्रसाठा सापडला होता, ज्यात पिस्तूल, मॅगझिन, राउंड्स आणि ग्रेनेड्सचा समावेश होता. प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठा घातपात घडवण्याचा पाकिस्तानचा हा कट असल्याचे मानले जात आहे.
'ऑपरेशन सिंदूर' आणि पाकिस्तानला इशारा
या ताज्या घडामोडींनंतर 'ऑपरेशन सिंदूर' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मे २०२५ मध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील जैश आणि लष्करच्या तळांवर हवाई हल्ले केले होते, ज्याला 'ऑपरेशन सिंदूर' असे नाव दिले गेले.
सीडीएस अनिल चौहान यांचे वक्तव्य
"ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही, तर ते केवळ थांबवण्यात आले आहे. जर पाकिस्तानने पुन्हा घुसखोरी किंवा दहशतवादी कारवाया केल्या, तर हे ऑपरेशन पुन्हा सक्रिय केले जाईल." लष्कराच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सीमेवर तणाव वाढला असून, कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय जवान सज्ज आहेत.
सुरक्षा दलांची मोठी शोध मोहीम
ड्रोन दिसलेल्या सर्व परिसरात लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी 'सर्च ऑपरेशन' सुरू केले आहे. दाट झाडी आणि डोंगराळ भागात ड्रोनने काही संशयास्पद वस्तू टाकली आहे का, याचा शोध घेतला जात आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications