मोदीजी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नावं ह्रदयाला स्पर्श करून गेलं, शुभम द्विवेदीची पत्नी भावनिक
पहलगाम हल्ल्याच्या १४ दिवसांनंतर, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कानपूरमधील श्याम नगर येथील रहिवासी शुभम द्विवेदी यांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर शुभमची पत्नी ऐशन्या म्हणाल्या की, आज शुभम कुठेही असला तरी त्याला नक्कीच थोडी शांती मिळाली असेल.
मला खात्री होती की पंतप्रधान मोदी बदला घेतील. त्यांनी हा विश्वास जिवंत ठेवला. ऐशन्या म्हणाल्या की, ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकताच मी रडू लागली. पंतप्रधानांनी या ऑपरेशनला दिलेले नाव माझ्यासारख्या त्या सर्व २६ महिलांच्या हृदयाला स्पर्शून गेले असंही ऐशन्याने म्हटलं आहे.

ANI शी बोलताना ऐशन्या खूप भावनिक दिसत होत्या. त्या म्हणाल्या की. शुभम गेल्यापासून घरात कोणी झोपत नाही. मंगळवारी रात्रीही आम्ही सगळे जागे होतो. मग आम्ही झोपायला गेलो, मग सुमारे २ वाजता बाबांच्या मोबाईलवर फोन आला आणि भारताने कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
मग आम्ही सर्वजण एकाच खोलीत टीव्हीसमोर बसलो. आम्ही रात्रभर टीव्हीला चिकटून राहिलो. ऑपरेशन सिंदूर हे नाव पाहिल्यानंतर मी रडू लागले. मोदीजी माझ्यासारख्या सर्व २६ महिलांच्या हृदयाशी जोडले गेले आहेत.
#WATCH | #OperationSindoor | Wife of Shubham Dwivedi, who lost his life in #PahalgamTerroristAttack, Aishanya Dwivedi says, "I want to thank PM Modi for taking revenge for my husband's death. My entire family had trust in him, and the way he replied (to Pakistan), he has kept our… pic.twitter.com/OOd4BIBHYu
— ANI (@ANI) May 7, 2025
ऐशन्या पुढे म्हणाल्या, , "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यामुळे आमचा विश्वास अबाधित राहिला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज त्यांना शांती मिळेल."
ऐशन्या म्हणाल्या की, ती या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या सर्व लोकांचे, आपल्या लष्कराच्या कर्मचाऱ्यांचे आणि इतरांचे आभार मानू इच्छिते. या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेल्या आमच्या सैनिकांसाठी आम्ही रात्रभर प्रार्थना करत होतो. मला खात्री होती की सूड घेतला जाईल. दहशतवाद कुठेही असला तरी संपला पाहिजे. आज, ज्या पद्धतीने आपण पाकिस्तानात घुसून ते ठिकाण उद्ध्वस्त केले, त्यावरून आपण हे दाखवून दिले आहे की आपण हे करू शकतो. मी मोदीजींचे आभार मानेन. आज तुम्ही मला असा आत्मविश्वास दिला आहे की मी पुन्हा एकदा म्हणेन की आपण हिंदू आहोत.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
विश्वविजेत्या टीम इंडियावर BCCIकडून पैशांचा पाऊस! ICCपेक्षा चौपट अन् 2024च्या पेक्षाही मोठं बक्षीस! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान










Click it and Unblock the Notifications