Pahalgam:हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्याचे घर बॉम्बने उडवले, दुसऱ्याचे घर बुलडोझरने पाडले- Video
Pahalgam Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेने देशभरात संतापाची लाट पसरली आहे. लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 4 दहशतवादी सहभागी होते. त्यापैकी दोन स्थानिक दहशतवादी होते.
दरम्यान, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित स्थानिक दहशतवादी आदिल हुसेन आणि आसिफ शेख यांची घरे पाडण्यात आली आहे. एकाच्या घरावर बुलडोजर चालविण्यात आले, तर दुसऱ्या दहशतवाद्याच्या घरावर बॉम्ब हल्ला करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील गोरी भागात असलेल्या दहशतवादी आदिल हुसेन ठोकरच्या घरावर सुरक्षा दलांनी बॉम्बहल्ला केला. आदिल ठोकर उर्फ आदिल गुरी असे ओळखल्या जाणाऱ्या या दहशतवाद्यावर 22 एप्रिल रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या हल्ल्याचे नियोजन करणे आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्याच वेळी, या हल्ल्यात सहभागी असलेला आणखी एक स्थानिक दहशतवादी आसिफ शेख याचे त्राल येथील घर जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने बुलडोझर लावून पाडले आहे.
#WATCH | Tral, J&K | Visuals of a destroyed house that is allegedly linked to a terrorist involved in the Pahalgam terror attack pic.twitter.com/luIH9rQIKR
— ANI (@ANI) April 25, 2025
हिंदू पर्यटकांना केले गेले टारगेट
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे एके-47 रायफल्स आणि बॉडी कॅमेरे घातलेल्या चार लष्कर-ए-तैयबा (LET) दहशतवाद्यांच्या गटाने हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले. त्यांच्यावर गोळीबार केला.
या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना आपला जीव गमवावा लागला, त्यापैकी बहुतेक पर्यटक होते आणि ते भारतातील विविध राज्यांमधून जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी आले होते.
दहशतवाद्यांमध्ये दोन स्थानिकांचाही समावेश होता. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. त्यांची नावे आदिल हुसेन ठोकर (रहिवासी-बिजबेहरा) आणि आसिफ शेख (रहिवासी-त्राल) अशी आहेत.












Click it and Unblock the Notifications