'विजयासाठी हल्ला करण्यास सज्ज!' भारताने सांगून केला स्ट्राईक, ऑपरेशनआधी लष्कराची पोस्ट! व्हिडिओ बघाच
Operation sindoor India issued warning through an army post video : भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदुरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ तळं उद्धवस्त केली आहेत. या हल्ल्यामुळे भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे. या हल्ल्यामुळे पहलगाम हल्ल्यात मृत झालेल्यांचे कुटुंबिय आता देशाला थँक्स म्हणत आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानवर हल्ला पुर्वनियोजित कसा होता हे आता उघड झाले आहे..

भारतीय सैन्याने सहा मे रोजी उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने राबवलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्ताननेही राफेल पाडल्याचा फेक दावा केला आहे. अशातच आता हल्ल्यापूर्वी भारतीय लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट करुन गुप्त संदेश दिला होता, त्यानंतर हा हल्ला केला.
"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः"
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
Ready to Strike, Trained to Win.#IndianArmy pic.twitter.com/M9CA9dv1Xx
भारताने सांगून केला हल्ला..
वनइंडिया हिंदीच्या वृत्तानुसार, भारतीय लष्कराने त्यांच्या अधिकृत हँडल @ADG PI-INDIAN ARMY वरून पहाटे 1.28 वाजता एक पोस्ट केली ज्यामध्ये लिहिले होते की, "प्रहार करण्यासाठी तयार, जिंकण्यासाठी प्रशिक्षित" हे संस्कृतमध्ये देखील लिहिले आहे, "प्रहारय सन्निहितह, जयया प्रक्षितः" म्हणजे "विजयासाठी आक्रमण करण्यास सज्ज". ही पोस्ट आता व्हायरल झाली आहे.
#PahalgamTerrorAttack
— ADG PI - INDIAN ARMY (@adgpi) May 6, 2025
Justice is Served.
Jai Hind! pic.twitter.com/Aruatj6OfA
आतापर्यंत पाकिस्तानवर तिसरे स्ट्राईक
भारतीय लष्कराने पहिले 'सर्जिकल स्ट्राईक' 2016 आणि दुसरे 'एअर स्ट्राईक' 2018 मध्ये केले होते, त्यावेळी अशा कोणत्याही पोस्टद्वारे हल्ल्याची माहिती दिली नव्हती. 6 मे 2025 रोजी तिसऱ्या हल्ल्यापुर्वी भारतीय लष्कराने पोस्टसोबत एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्याची शस्त्रे, दारूगोळा आणि रणगाडे दाखवले आहेत. या पोस्टनंतर काही मिनिटांतच, संरक्षण मंत्रालयाने दहशतवादी अड्ड्यांवरील हल्ल्या केल्याचे स्पष्ट केले. भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील 4 जैश-ए-मोहम्मद, 3 लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि 2 हिजबुल मुजाहिदिनच्या तळाला लक्ष्य केले आहे.
पाकचा कांगावा..अन् फेक दावा
भारतीय लष्कराने हवाई हल्ला केल्यानंतर आता पाकिस्तानने कांगावा करायला सुरुवात केली आहे. आम्ही भारताचे राफेल विमान पाडले असे म्हणत त्यांनी काही दावे केले. यासह भारतीय लष्करी तळ उद्धवस्त केले असाही दावा आहे पण मुळात हे दावे फेक आहेत, कारण पाकिस्तानने दावा करताना जे राफेल विमान पाडल्याचे छायाचित्र दाखवले ते राजस्थानमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या राफेल विमानाचे 2024 मधील छायाचित्र आहे.
हेही वाचा : ..म्हणे राफेल पाडले! पाकिस्तानचा फेक दावा; 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानची हवा टाईट, आता धडपड सुरु
हेही वाचा : भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला;'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानातील 9 दहशतवादी अड्डे उडवले












Click it and Unblock the Notifications