Nowshera Terrorists Attack:जम्मू- काश्मीरमध्ये अतिरेक्यांची घुसखोरी, लष्कराकडून दोघांना कंठस्थान
Nowshera Terrorists Attack: जम्मू आणि काश्मीरच्या नौशेरा भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आणि जोरदार गोळीबार सुरु केला. यानंतर लष्कराने केलेल्या हल्ल्यात भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं.
जम्मू काश्मिरात गेल्या काही दिवसांपासून सतत दहशतवादी करवाया सुरु आहेत. घुसखोरीचे प्रयत्नही अतिरेकी करत आहेत. या कारवायांना भारतीय लष्कर चोख प्रत्त्युत्तर देत आहे.

प्राप्त माहितीनुसार, कालपासून नौशेरा परिसरात काही गुप्त हालचाली दहशतावाद्यांच्या सुरु होत्या. याची भारतीय जवानांना कुणकुण लागली. दरम्यान, अतिरेक्यांकडून गोळ्यांचा भडिमार झाला. प्रत्युत्तरादाखल लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.
OP KANCHI
— White Knight Corps (@Whiteknight_IA) September 9, 2024
Based on inputs from intelligence agencies and @JmuKmrPolice regarding a likely infiltration bid, an anti-infiltration Operation was launched by #IndianArmy on the intervening night of 08-09 Sep 24 in general area Lam, #Nowshera.
Two terrorists
have been neutralised… pic.twitter.com/Gew0jtbpwI
दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. जो भारतीय जवानांनी हाणून पाडला. ही संपूर्ण घटना 8 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान रात्री उशिरा घडली.
ऑपरेशन 'कांची'
भारतीय लष्कराने सोमवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या नौशेरा येथील लाम, जनरल एरिया, 8 ते 9 सप्टेंबर दरम्यान रात्री दोन दहशतवादी मारले गेले. घुसखोरीच्या संभाव्य प्रयत्नाबाबत गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, भारतीय लष्कराने घुसखोरीविरोधी कारवाई सुरू केली. भारतीय लष्कराने या ऑपरेशनला कांची असे नाव दिले आहे.
मोहिम सुरुच
भारतीय लष्कराने एक्स न्यूज चॅनलवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की दोन दहशतवादी मारले गेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात युद्ध सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यात पुढे म्हटले आहे की, "ऑपरेशन प्रगतीपथावर आहे."












Click it and Unblock the Notifications