महाकुंभाचे आता फक्त चार शाही स्नान बाकी; जाणून घ्या, काय आहेत तारखा? कधी संपणार कुंभमेळा?
कुंभमेळा हा दर १२ वर्षांनी येतो. त्याला पूर्णकुंभमेळा म्हणातात. जेव्हा बारा पूर्ण कुंभमेळे पूर्ण होतात तेव्हा महाकुंभमेळा येतो. म्हणजेच महाकुंभमेळा हा १४४ वर्षानंतर येतो. सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याचे दोन शाही स्थान पूर्ण झाले आहेत. आता फक्त चार शाही स्थान बाकी आहेत. या शाही स्थानाच्या तारखा, कुंभमेळा संपण्याची तारीख आपण आज जाणून घेणार आहोत...

शाही स्नानाच्या तारखा कोणत्या
यंदाच्या महाकुंभमेळ्यात सहा शाही स्नान आहेत. पौष पौर्णिमा (१३-१-२५ सोमवार), मकर संक्रांत (१४-१-२५, मंगळवार), मौनी अमावस्या (२९-१-२५, बुधवार), वसंत पंचमी (३-२-२५, सोमवार), माघी पौर्णिमा (१२-२-२५, बुधवार) आणि महाशिवरात्री (२६-२-२५, बुधवार) या दिवशी शाही स्नानाचे मुहूर्त आहेत. यंदाच्या कुंभमेळ्याला १३ जानेवारीपासून सुरुवात झाली. आत्तापर्यंत पहिले शाहीस्नान पौष पौर्णिमेला तर दुसरे शाही स्नान मकर संक्रातीला झाले. आता परवा दिवशी मौनी आमावस्येला तिसरे शाही स्नान होणार आहे.
समारोप कधी होणार
महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नान याच दिवशी होणार आहे. आत्तापर्यंत दोन शाही स्नान पूर्ण झाले असून अजून चार शाही स्नान शिल्लक आहेत. मौनी अमावस्या, वसंत पंचमी, माघी पौर्णिमा आणि महाशिवरात्री या चार स्नानांसाठीही करोडो भाविकांची गर्दी होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढचा कुंभमेळा कधी?
महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. त्याच दिवशी शेवटचे शाही स्नान होणार आहे. प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर हा शाही सोहळा सध्या सुरु आहे. महाकुंभमेळा २०२५ नंतर आता २०२८ मध्ये मध्यप्रदेशातील उज्जैन येथे सिंहस्थ महाकुंभ होणार आहे.












Click it and Unblock the Notifications