मनगटावर लाल चुडा, हातावर मेहंदी... पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेली हिमानी; पहा पत्नीचा दुर्देवी आक्रोश
जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम हिल स्टेशनवर मंगळवारी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या १६ जणांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात हरियाणातील २६ वर्षीय नौदल अधिकारी विनय नरवालचे यांचेही नाव होते. नुकतीच त्यांची कोची येथे लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली होती. दुर्देव म्हणजे, विनय नरवाल यांचे लग्न १६ एप्रिलला झाले. नरवाल आपल्या पत्नीसोबत पहलगामला भेट देण्यासाठी गेले होते. तेव्हाच मृत्यूने त्यांना गाठले. या घटनेनंतर सगळा देश दुःखात बुडाला. विशेष म्हणजे १ मे रोजी विनय आपल्या कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार होते.

हातावरची मेहंदीही होती ताजी
लाल चुडा, दोन्ही हातांवर अगदी ताजी असलेली मेहंदी घेऊन विनय नरवाल व हिमानी नरवाल हे पहलगामला गेले होते. हिमानी ही सहा दिवसांपूर्वीच नवरी झाली होती. आपला हनिमून साजरा करत असतानाच काळाने विनयवर घाला घातला. हिमानीने पहलगाममध्ये आपले सर्वस्व गमावले. आपल्या डोळ्यासमोर पतीला प्राण सोडताना पाहणारी हिमानी विषयी संपूर्ण जगात शोक व्यक्त केला जात आहे. पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या हिमानीचा फोटो कायम स्मरणात राहिल.
कोची येथे होती पोस्टींग
या हल्ल्यात ठार झालेले विनय नरवाल हे फक्त २६ वर्षांचे होते. सध्या ते कोची येथे तैनात होते. विनय नरवाल यांच्या छाती, माने आणि डाव्या हातावर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. त्याच त्यांचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार विनय २ वर्षांपूर्वी भारतीय नौदलात सामील झाला होता. १६ एप्रिल रोजी कुटुंबाने रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले होते. यानंतर दोघेही पती-पत्नी २१ एप्रिल रोजी हनिमून साजरा करण्यासाठी पहलगामला रवाना झाले. या घटनेपासून त्याच्या घरात शोककळा पसरली आहे. कुटुंबातील काही सदस्य श्रीनगरला रवाना झाले आहेत.
#WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay Narwal's wife bids an emotional farewell to her husband, who was killed in the Pahalgam terror attack
— ANI (@ANI) April 23, 2025
The couple got married on April 16. pic.twitter.com/KJpLEeyxfJ
भेळपुरी खाताना मारल्या गोळ्या
पहलगाममधील घटनेनंतर विनयच्या पत्नीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये ती म्हणत आहे की, तिचा नवरा भेळपुरी खात होता. यावेळी दहशतवाद्यांना वाटले की तो मुस्लिम नाही आणि त्यांनी त्याला गोळ्या घातल्या. विनयच्या गावातील भुसली येथील पंच सुरेंद्र कुमार यांनी सांगितले की, आमच्या गावातील एक मुलगा नौदलात लेफ्टनंट म्हणून तैनात होता. संध्याकाळी उशिरा कळले की त्याला दहशतवादी हल्ल्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. विनयचे लग्न १३ एप्रिल रोजी झाले होते. गावात शोकाकुल वातावरण आहे.












Click it and Unblock the Notifications