National Science Day 2025 Wishesh : विज्ञान दिनानिमित्त तुमच्या मित्राला पाठवा खास शुभेच्छा संदेश!
National Science Day 2025 Marathi Wishes : फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस अर्थात २८ फेब्रुवारीला एक विशेष दिवस म्हणून साजरा केला जातो. तो दिवस आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस. राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून तुम्ही तुमच्या मित्र परिवाराला विशेष शुभेच्छा संदेश पाठवू शकता व विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करू शकता...!
का साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिवस?
सर सी.व्ही. रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमन इफेक्टचा शोध लावला होता. या निमित्ताने दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व दर्शवितो आणि तरुणांना विज्ञानाला करिअर म्हणून स्वीकारण्यास प्रोत्साहित करतो.

विज्ञान दिन कसा साजरा केला जातो?
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने संपूर्ण भारतात विज्ञान मेळावे, प्रदर्शने आणि विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांमध्ये वैज्ञानिक साक्षरता आणि जागरूकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाचा पाठपुरावा करण्यास प्रोत्साहित करणे आहे.
आपल्या मित्र परिवाला पाठवा हे खास शुभेच्छा संदेश...!
- महान भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते आणि भारतरत्न सर सी.व्ही. रमण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्याला सर्वांना आठवण करून देतो की आपण नवीन ज्ञानाने स्वतःला प्रबुद्ध करण्यासाठी विज्ञानाच्या जगात भ्रमंती केली पाहिजे. - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
- राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करूया आणि आपण जे काही जाणतो त्यावर कधीही समाधानी राहणार नाही आणि अधिकाधिक शोध घेत राहू अशी प्रतिज्ञा करूया. - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!

डॉ. सी.व्ही. रमन यांचे विज्ञानातील योगदान आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनामुळे भारत आणि जगाला मोठी मदत झाली. भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याला विनम्र अभिवादन! - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
- राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त नोबेल पुरस्कार विजेते भारतरत्न डॉ. सी.व्ही. रमन यांना आदरांजली. - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
महान भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार विजेते भारतरत्न सर सी.व्ही. रमण यांना विनम्र अभिवादन! - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा!
- विज्ञान हे असे साधन आहे ज्याने आपल्याला हे जग बदलण्याची शक्ती दिली. त्यामुळे आपण त्याचा सुज्ञपणे वापर केला पाहिजे. - सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

विज्ञान म्हणजे जीवनात अनेक नवीन गोष्टी शिकण्याचा आणि ज्ञानाने तुमचे प्रश्न सोडवण्याचा मार्ग. - तुम्हाला राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
- धर्माशिवाय विज्ञान लंगडे आहे आणि विज्ञानाशिवाय धर्म आंधळा आहे. - राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!..












Click it and Unblock the Notifications