Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mukul roy Death : बंगालच्या राजकारणातील 'चाणक्य' हरपला! माजी रेल्वेमंत्र्याचे मुकूल राॅय यांचे निधन

Mukul roy passes away : पश्चिम बंगालच्या राजकारणात आपल्या चाणाक्ष रणनीतीने तृणमूल काँग्रेसला शून्यातून विश्व निर्माण करून देणारे ज्येष्ठ नेते आणि माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय यांचे सोमवारी (२३ फेब्रुवारी २०२६) पहाटे १:३० च्या सुमारास निधन झाले. ७१ वर्षीय मुकुल रॉय गेल्या अनेक महिन्यांपासून डिमेंशिया आणि पार्किन्सनसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त होते. त्यांच्या निधनाने बंगालच्या राजकारणातील एका मोठ्या पर्वाचा अंत झाला आहे.

Mukul roy passes away

ममता दीदींचे 'संकटमोचक' आणि टीएमसीचे आधारस्तंभ

मुकुल रॉय यांची ओळख केवळ एक नेता म्हणून नव्हती, तर ते ममता बॅनर्जींचे सर्वात विश्वासू रणनीतीकार होते. १ जानेवारी १९९८ रोजी जेव्हा ममता बॅनर्जींनी काँग्रेसमधून बाहेर पडून 'तृणमूल काँग्रेस'ची स्थापना केली, तेव्हा मुकुल रॉय हे संस्थापक सदस्यांपैकी एक होते. २०११ मध्ये पश्चिम बंगालमधील ३४ वर्षांची डाव्यांची सत्ता उलथवून लावण्यात रॉय यांच्या संघटनात्मक कौशल्याचा आणि 'बूथ मॅनेजमेंट'चा सिंहाचा वाटा होता.

केंद्रातील राजकीय दबदबा आणि रेल्वेमंत्रिपद

मुकुल रॉय यांनी केवळ राज्याच्याच नव्हे, तर केंद्राच्या राजकारणातही आपली छाप पाडली होती. युपीए-२ सरकारच्या काळात त्यांनी जहाजबांधणी राज्यमंत्री आणि मार्च २०१२ मध्ये रेल्वेमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. रेल्वे भाडेवाढीवरून झालेल्या वादानंतर त्यांनी सूत्रे हाती घेतली होती. ममता बॅनर्जी दिल्लीत नसताना पक्षाचा चेहरा म्हणून मुकुल रॉय खंबीरपणे उभे असायचे.

राजकीय वळणे आणि भाजप प्रवेश

मुकुल रॉय यांचा राजकीय प्रवास अत्यंत नाट्यमय राहिला. २०१७ मध्ये काही मतभेदांमुळे त्यांनी टीएमसी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या रणनीतीमुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये १८ जागा जिंकून सर्वांना धक्का दिला होता. मात्र, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा तृणमूलमध्ये परतले. वाढत्या वयामुळे आणि आजारपणामुळे ते गेल्या दोन वर्षांपासून सक्रिय राजकारणापासून दूर होते.

राजकीय शोककळा

जुलै २०२४ मध्ये घरात पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी आणि भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मुकुल रॉय यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+