MP Balaghat Crime News : धक्कादायक! बालाघाटमध्ये 3 आदीवासी मुलींसह चौघींवर 7 जणांचा बलात्कार
MP Balaghat Crime News : मध्यप्रदेशच्या बालाघाटमध्ये एक गंभीर आणि तितकीच हृदयद्रावक घटना समोर आली आहे. तीन अल्पवयीन आणि एका तरुण आदिवासी मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर या परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

लग्नातून रात्री गावी येताना घडला प्रकार
प्राप्त माहितीनुसार, रात्री 1 ते 2 च्या दरम्यान एका लग्न समारंभातून मुली आपल्या भावासोबत गावी परतत होत्या. यावेळी संशयित आरोपींनी मुलींचा पाठलाग केला आणि त्यांना घनदाट जंगलात नेले. तिथे दोन मुलांनी एक-एक करून त्यांच्यावर बलात्कार केला.
यासंदर्भात एनडीटीव्हीने वृत्त दिले आहे, त्यानुसार,सर्व संशयित आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस कसोशीने करत आहेत.
14, 15, 16 वर्ष वयाच्या मुली अन् 21 वर्षीय तरुणीशी कृत्य
प्राप्त माहितीनुसार, पीडित तीन अल्पवयीन मुलींचे वय 14, 15, 16 वर्षे आणि एका तरुणीचे वय 21 वर्षे आहे. आता घटनेत किती संशयित आहेत, या संशयितांमध्ये आणखी कुणा-कुणाचा सहभाग आहे का याची चाचपणी पोलिस करत आहेत. दरम्यान, पीडित मुलींची वैद्यकीय चाचणी प्रक्रिया पार पडत आहे. भोपाळमध्ये अशी घटना घडल्यानंतर बालाघाटमध्येही आता बलात्काराची घटना उघडकीस आली आहे, लग्नातून परत येताना याच लग्नात उपस्थिती लावणाऱ्या सात जणांकडून हे कृत्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
अशी घडली सामुहिक अत्याचाराची घटना
रात्री एक ते दीड वाजेची ही घटना असून घनदाट जंगलातून त्या जात होत्या, त्यावेळी वेगवेगळ्या दुचाकीवर असलेल्या सात युवकांनी मुलींचा पाठलाग केला. तर दुसऱ्या दोन दुचाकी घेऊन मुली जात होत्या. त्यात एक भाऊ एक दुचाकी तर एक तरुणी दुसरी दुचाकी चालवत होती. त्यावेळी संशयित आरोपींनी दुचाकीला धक्का देऊन पाडले. त्यानंतर त्यांच्या भावाला धमकावून घटनास्थळाहून पलायन करण्यास संशयित आरोपींनी भाग पाडले. त्यानंतर मुलींवर संशयितांनी जंगलात नेत अत्याचार केला आहे.
चारपैकी तीन मुली अल्पवयीन, आरोपींची संख्या वाढू शकते
रिपोर्टनुसार, चार पीडित मुलींपैकी तीन अल्पवयीन आहेत तर एक तरुणी अठरा वर्षांवरील आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. संशयितांना अटक करण्यात आली आहे तर या प्रकरणी एसआयटी गठीत करण्याच्या हालचाली पोलिस करत आहेत. संशयितांमध्ये अजून चार ते पाच जण सहभागी असू शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.












Click it and Unblock the Notifications