Video : 5 मुस्लिम युवतींनी हिंदू विद्यार्थिनीला कोपऱ्यात नेलं अन् बळजबरी बुरखा घातला, थरारक व्हिडिओ.
Moradabad burqa viral video : उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील बिलारी शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कोचिंग क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनीला तिच्याच पाच मुस्लिम मैत्रिणींनी रस्त्यात गाठून बुरखा घालण्यास भाग पाडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी पाच मुलींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी पाचही मुली एकाच शाळेत १२ वीत शिकतात आणि एकाच कोचिंग क्लासला जातात. या मुलींचे वय १५ ते १७ वर्षांच्या दरम्यान आहे. २२ जानेवारी रोजी पीडितेच्या भावाने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. ही घटना २० डिसेंबर रोजी घडली होती, ज्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.
तक्रारीनुसार, कोचिंग क्लास संपवून बाहेर पडल्यानंतर या पाच मुलींनी हिंदू विद्यार्थिनीला रस्त्यात घेरले. त्यांनी आपल्या बॅगेतून बुरखा काढला आणि पीडितेवर तो घालण्यासाठी दबाव टाकला. "तू यात खूप सुंदर दिसशील, तुझे नशीब बदलेल," असे आमिष दाखवत तिला बुरखा घालण्यास भाग पाडण्यात आले.
FIR Filed Against 5 Muslim Students in Moradabad For Allegedly Forcing Hindu Girl To Wear Burqa#Moradabad | FIR registered against 5 Muslim students in Billari police station area for allegedly forcing a Hindu girl student to wear a burqa. The incident reportedly took place on… pic.twitter.com/lDmbjapqfE
— Atulkrishan (@iAtulKrishan1) January 23, 2026
"बहिणीचे ब्रेनवॉशिंग केले"
पीडितेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या मुली गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या बहिणीचे 'ब्रेनवॉशिंग' करत होत्या. "माझ्या बहिणीला वारंवार इस्लाम धर्म स्वीकारण्यास सांगितले जात होते. तिच्या मनात हिंदू धर्माबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला," असा आरोप भावाने केला आहे. या घटनेमागे केवळ या मुली नसून एखादी मोठी इस्लामिक संघटना असू शकते, जी शालेय मुलींच्या माध्यमातून धर्मांतराचे जाळे पसरवत आहे, असा संशयही तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.
हिंदू संघटना आक्रमक
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक हिंदू संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. शाळा आणि शैक्षणिक संस्थांना अशा धार्मिक धर्मांतराच्या कारस्थानांपासून दूर ठेवण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. "अल्पवयीन मुलींचा वापर करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींचा पर्दाफाश झाला पाहिजे," अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे.
पोलीस कारवाई आणि कायदेशीर बाजू
मुरादाबादचे एसपी (ग्रामीण) कुंवर आकाश यांनी सांगितले की, प्राप्त तक्रारीच्या आधारे एफआयआर (FIR) नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. जर तपासात दोषी आढळले, तर या मुलींना अटक करून बाल न्याय मंडळासमोर (Juvenile Justice Board) हजर केले जाईल. अशा प्रकरणांमध्ये जास्तीत जास्त ५ वर्षांची शिक्षा आणि १५,००० रुपये दंडाची तरतूद आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे या घटनेमागे कोणाचे चिथावणीखोर मार्गदर्शन होते का, याचा शोध घेत आहेत.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications