‘एक पेड माँ के नाम ' देशभर अभियान; मन की बातमधून मोदींची घोषणा
नवी दिल्ली : देशात अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDA सरकारची स्थापना झाली. मोदी 3.0 असा या सरकारचा उल्लेख केला जात आहे. त्यात आता या मोदी सरकारची पहिली मन की बात आज पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात'चा आज 111 वा भाग होता. सर्वांच्या जीवनात आईचे स्थान अढळ आहे.

एक पेड माँ के नाम :
अशात मोदींनी 'एक पेड माँ' के नाम अभियानाची घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींकडून त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा यावेळी देण्यात आला. आईच्या नावाने प्रत्येकाने एक झाड लावण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केले.
खरतर 2024 या वर्षात जानेवारी ते जून या काळात सर्वत्र भयंकर उष्णता सर्वांनी अनुभवली. ग्लोबल वॉर्मिगचे भयावह रूप अवघ्या देशाने पाहिले आहे. अशात पंतप्रधान मोदी यांच्या या घोषणेचे महत्व मोठे आहे.
पंतप्रधान मोदींनी 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाची केली घोषणा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमाच्या 111 व्या भागात 'एक पेड माँ के नाम' उपक्रमाचं कौतुक केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, "जगातील सर्वात मौल्यवान नाते हे 'आई' आणि आपलं आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईचा दर्जा सर्वोच्च आहे. आई आपल्याला निस्वार्थीपणे अनेक गोष्टी देते.
आपणही तिचे काही देणे लागतो. जन्मदात्या आईचे हे प्रेम, आपण सर्वजण कोणीही फेडू शकत नाही, असे कर्ज आहे. त्याचबरोबर ही वसुंधरा देखील आपली आई आहे. आपण तिच्या रक्षणासाठी किमान एक झाड लावावे. आपणही आईच्या नावे एक झाड लावल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.
तुम्हाला मायेची ऊब हवी तर मग आईच्या नावे प्रत्येक भारतीयाने एक वृक्ष लावावा आणि त्याला जगवावे. कारण पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी केंद्र शासनाने 140 कोटी जनतेच्या खांद्यावर 140 कोटी वृक्ष लागवडीची जबाबदारी सोपवली आहे. 'एक पेड मॉ के नाम' ही संकल्पना राबविण्याचा निर्धार सोडला आहे. आईच्या नावाने लावलेले झाड भविष्यात मुलांना नक्कीच सुखाची सावली देईल, यात दुमत नाही.
आता देशभरातून या अभियानाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. खरतर आपण ही या अभियानात हिरहिरीने सहभागी होण्याची गरज आहे. आगामी काळात दुष्काळ, ग्लोबल वॉर्मिग, पाण्याची कमतरता, उष्णता या गोष्टींपासून आपणास सुटका करवून घ्यायची असेल तर झाड लावणे अत्यंत जरुईचे आहे. त्याचं बरोबर त्याचे रक्षणसुद्धा करावे लागेल.












Click it and Unblock the Notifications