Mehul Choksi Net Worth : PNB घोटाळ्याचा आरोपी मेहूल चौकशीची संपत्ती किती आहे? कोण आहे त्याची पत्नी?
Mehul Choksi Net Worth : पंजाब नॅशनल बँकेच्या 13,500 कोटींच्या कर्ज घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चौक्शीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय यंत्रणांच्या विनंतीवरुन बेल्जियम पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान आता या घोटाळ्यातील खटल्याला गती येणार असून मेहुल चौक्शीची संपत्ती किती आणि त्याची पत्नी कोण याची चर्चा होत आहे.
मेहुल चौकशी अफाट संपत्तीचा मालक होता. हिऱ्याच्या व्यवसायात त्याने अमाप पैसा गोळा केला होता. त्याची संपत्ती डोळेही विस्फारतील एवढी होती पण एका पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्याने तो होत्याचे नव्हते झाला आहे. आज त्याच्यावर केसेस तर आहेतच पण खटल्यालाही सामोरे जावे लागत आहे तर दुसरीकडे त्याची प्रकृतीही फारशी चांगली राहत नाही यामुळे तो आता विंवचनेत आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, मेहूल चौक्शीकडे कधी काळी अफाट म्हणजेच 20 हजार कोटींपेक्षा जास्त संपत्ती होती. मेहुल चोक्सीच्या नेतृत्वाखाली त्याच्या कंपन्यांचा व्यवसाय झपाट्याने वाढला. त्यांनी जेव्हा कंपनीचा कार्यभार स्वीकारला तेव्हा तिची उलाढाल 50 कोटी रुपये होती. चोक्सीने त्याचा विस्तार जगभरातील देशांमध्ये केला. 2006 मध्ये गीतांजलीने सॅम्युअल ज्वेलर्स यूएस कंपनीसोबत करार केला. अमेरिकेतील 111 मोठ्या स्टोअर्समध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले होते.
कमी वेळेत जास्त पैसा कमावयचा होता
प्राप्त माहितीनुसार, कमी वेळात जास्त पैसे कमवायचे होते. मेहुल चोक्सीने आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रत्येक युक्तीचा अवलंब केला. हिऱ्यांच्या गुणवत्तेशीही तडजोड त्याने केली हे सांगितले जाते. जर आपण नेट वर्थबद्दल बोललो तर, बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत खुद्द मेहुल चोक्सीने सांगितले होते की, जेव्हा त्याने भारत सोडला तेव्हा त्याच्याकडे 20,000 कोटी रुपयांची संपत्ती होती. पीएनबी घोटाळ्यानंतर त्यांची मालमत्ता ईडी आणि सीबीआयने जप्त केली होती. चोक्सीने सांगितले की, मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याच्याकडे काहीच उरले नाही.
पैशांत खेळत होता मेहुल चौक्शी
मेहुल चौक्शी पैशांत खेळायचा म्हणजेच त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने पीएनबी घोटाळ्यानंतर त्याच्यावर आरोप झाले व गुन्हाही नोंदवण्यात आला होता. दरम्यान, मुंबईतील एका विशेष न्यायालयाने फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीशी संबंधित 2,565.9 कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या लिलावाला परवानगी दिली होती.
मेहुलच्या संपत्तीच्या लिलाव
मेहुलकडे सांताक्रूझमधील खेनी टॉवरमधील सुमारे 25 कोटी रुपये किमतीचे फ्लॅट तसेच अंधेरी पूर्वेतील सीप्झमधील 98.03 कोटी रुपये किमतीच्या दोन मालमत्ता होत्या, यासह अनेक मालमत्ता त्याच्याकडे होत्या पण त्यानंतर ईडीने चोक्सीशी संबंधित 2,565.9 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ज्यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता, वाहने, कारखान्यातील उपकरणे, शेअर्स आणि दागिने यांचा समावेश होता. ईडीने चोक्सीच्या गीतांजली ग्रुप ऑफ कंपन्यांमधून 597.75 कोटी रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू देखील जप्त केल्या. याशिवाय त्याच्याकडे परदेशातही संपत्ती आणि पैसा असल्याचे बोलले जाते.
कोण आहे मेहुल चौक्शीची पत्नी?
मेहूल चौक्शीची पत्नीचे नाव प्रिती चौक्शी आहे. पीएनबी घोटाळ्यात त्यांचे नाव आले होते. त्या काही काळ इडीच्या रडारवरही होत्या. दरम्यान, त्यांनी आपले पती निर्दोष असल्याचाही दावा केला होता. आपल्या पतीचे अपहरण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता. मेहुल चौक्शीच्या व्यवसायात पत्नी प्रिती यांचा रोल होता. त्यामुळेच तपास यंत्रणांनी पीएनबी घोटाळ्यात त्यांच्यावर ठपका ठेवल्याचे बोलले जाते.












Click it and Unblock the Notifications