Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धक्कादायक! फुटबॉल खेळताना हार्टअ‍ॅटॅक; 'या' खासदाराचा 54 व्या वर्षी मृत्यू! राजकीय क्षेत्र हळहळलं

Meghalaya mp ricky aj syngkon dies heart attack : मेघालयातील राजकारणातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिलाँग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रिकी एजे सिंगकोन यांचे गुरुवारी (१९ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी फुटबॉल खेळत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मैदानावर खेळताना ते अचानक कोसळले आणि काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.

Meghalaya mp ricky aj syngkon dies

मैदानावरच कोसळले खासदार

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार रिकी सिंगकोन गुरुवारी संध्याकाळी शिलाँगजवळील मावलाई मावियोंग येथे मित्रांसोबत फुटबॉल (फुटसल) खेळत होते. खेळादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते अचानक मैदानावर कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये नेण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांची अनुपलब्धता असल्याने त्यांना 'डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स' रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

राजकीय कारकीर्द आणि ऐतिहासिक विजय

डॉ. रिकी सिंगकोन हे 'व्हॉईस ऑफ द पीपल पार्टी' (VPP) चे नेते होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसचे तीन वेळा खासदार राहिलेले दिग्गज नेते विन्सेंट एच. पाला यांचा ३.७ लाखांहून अधिक मतांच्या फरकाने पराभव करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते 'नॉर्थ-ईस्टर्न हिल युनिव्हर्सिटी'मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

राज्यावर शोककळा

त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टिनसोंग आणि व्हीपीपीचे अध्यक्ष अर्डेंट मिलर बसाईवमोइट यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात धाव घेतली. मुख्यमंत्री संगमा यांनी शोक व्यक्त करताना म्हटले की, "डॉ. रिकी हे एक समर्पित आणि नम्र लोकनेते होते. त्यांच्या निधनाने मेघालयाची मोठी हानी झाली आहे."

सन्मान म्हणून, आज (२० फेब्रुवारी) होणारे मेघालयाचे बजेट अधिवेशन तहकूब केले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

"शिलाँगचे सन्माननीय खासदार डॉ. रिकी ए. जे. सिंगकोन यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून मला अत्यंत धक्का बसला असून मनाला खोलवर दुःख झाले आहे.

डॉ. रिकी हे एक समर्पित आणि अत्यंत संवेदनशील लोकनेते होते. जनसेवेची तीव्र तळमळ आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी होती. ते धर्मावर श्रद्धा असणारे आणि अत्यंत नम्र व्यक्तिमत्त्व होते. समाजाचा उत्कर्ष व्हावा या प्रामाणिक इच्छेतून त्यांनी नेहमीच दूरदृष्टीने काम केले.

त्यांच्या जाण्याने मेघालयाने एक सच्चा लोकसेवक गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाच्या व समर्थकांच्या दुःखात सहभागी आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+