Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बंगळुरूतील महालक्ष्मीच्या खुनातील संशयिताची ओळख पटली! फ्रीजमध्ये आढळले होते मृतदेहाचे 32 तुकडे

Mahalaxmi murder suspect identified :कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये 29 वर्षीय महिला महालक्ष्मीच्या निर्घृण हत्याकांडात मोठा खुलासा झाला आहे. हत्येशी संबंधित मुख्य संशयिताची ओळख पटली असल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी दिली आहे. संशयित पश्चिम बंगालचा असून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

21 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचा मृतदेह बंगळुरूच्या व्यालीकवल भागात तिच्या अपार्टमेंटच्या रेफ्रिजरेटरमध्ये सापडला होता. पतीपासून विभक्त होऊन ती एका खोलीत एकटीच राहत होती. या घटनेमुळे बंगळुरूसह देशभरातील महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

Mahalaxmi murder suspect identified

या निर्घुण हत्याकांडावर गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी जनतेला आश्वासन दिले की, सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सतर्क आणि वचनबद्ध आहे. बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या निर्भया हत्याकांडाचा दाखला देत ते म्हणाले की, शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत आणि इतर सुरक्षा उपायांवरही वेगाने काम केले जात आहे.

असे आहे मुख्य संशयिताचे वर्णन

या प्रकरणातील मुख्य संशयिताचे वर्णन करताना गृहमंत्र्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील एक व्यक्ती संशयित असल्याची माहिती आहे. त्याला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अटकेला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तसेच संशयितांची चौकशी सुरू असून तपास गंभीर वळणावर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले.

या खून प्रकरणासोबतच राज्यात राजकीय वादालाही तोंड फुटले आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील उपकरण खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत वैद्यकीय शिक्षणमंत्री शरण प्रकाश पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी अशी मागणी झाल्याच्या संदर्भात माहिती नसल्याचे सांगितले.

महालक्ष्मीच्या वेदनादायक हत्येमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. समाज व पीडित कुटुंबाकडून न्यायाची मागणी जोर धरू लागली आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य संशयिताच्या संभाव्य अटकेबाबत गृहमंत्र्यांनी दिलेली माहिती या प्रकरणात मोठी प्रगती ठरू शकते. त्यामुळे न्याय मिळण्याची आशा वाढली आहे.

ती राहायची पतीपासून वेगळी!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,महिला विवाहित असून वैयक्तिक कारणास्तव ती गेल्या पाच महिन्यांपासून ती पती आणि मुलापासून वेगळी राहत होती. ती राहत असलेल्या भाड्याच्या घरात तरूणीची आई आणि कुटुंबीय घरी आले असता तिचा फोन बंद असल्यानं त्यांना संशय आला.

त्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही घटना उघडकीस आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तसंच घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब चं पथकही पोहोचलं. दरम्यान या घटनेचा आता तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी माध्यमांना माहिती दिली की तरूणी दुसऱ्या राज्यातून आली होती. ती बंगळुरूमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. तरूणीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले होते.

मृतदेहाच्या तुकड्यांवर रसायनांची फवारणी

या महिलेची हत्या काही दिवसांपूर्वीच झाली होती. संशयित मारेकऱ्यानं तरुणीच्या मृतदेहाचे 32 तुकडे केले आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले. दुर्गंध येऊ नये, म्हणून मृतदेहाच्या तुकड्यांवर रसायनांची फवारणी केली. हत्या केल्यानंतर आरोपीनं घराला कुलूप लावून पळ काढला. तरूणीचा फोन 2 सप्टेंबर रोजी बंद होता म्हणजेच कदाचित याच दिवशी झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी पोलिसांनी व्यक्त केलीय.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+