Mahashivratri:महाशिवरात्री का साजरी केली जाते, महत्त्व काय, जाणून घ्या त्यामागील सर्व धार्मिक रहस्य
Mahashivratri 2025 : महाशिवरात्री हा एक हिंदू सणातील अतिशय महत्त्वाचा सण आहे. जो देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मातील त्रिदेवांपैकी एक असलेल्या भगवान शिव शंकराची आराधना या महाशिवरात्रीला केली जाते. या दिवशी देशभरातील मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम व उत्सव असतात. महाशिवरात्री, ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ "शिवांची महान रात्र" असा होतो. हा सण हिंदू कॅलेंडरातील फाल्गुण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चौदाव्या रात्री येतो. 2025 मध्ये, महाशिवरात्री 26 फेबुर्वारी रोजी साजरी केली जात आहे.
महाशिवरात्रीची तिथी व पूजा मुहूर्त कधी?
तिथी
चतुर्दशी तिथी सुरू होते: 26 फेब्रुवारी 2025, सकाळी 11:08 वाजता
चतुर्दशी तिथी संपेल: 27 फेब्रुवारी 2025, सकाळी 08:54 वाजता
मुख्य पूजेच्या वेळा
निशिता काल पूजा: 27 फेब्रुवारी 2025, सकाळी 12:09 ते 12:59 AM
शिवरात्री पारणाची वेळ: 27 फेब्रुवारी 2025, सकाळी 06:48 ते 08:54 पर्यंत

महाशिवरात्रीला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व?
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास ते सोडला जातो.
महाशिवरात्रीची आख्यायिका काय आहे?
महाशिवरात्री या नावावरुन आपल्याला बरंच काही समजते. महाशिवरात्रीचे धार्मिक महत्त्व देखील आहे. सर्वात आधी जाणून घेऊया की, महाशिवरात्री कधीपासून साजरी केली जाते. त्याची एक आख्यायिका सांगितले जाते. समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले आणि हेच ऋण फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री असे सांगितले जाते. काही कथेनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीच विवाह झाला होता. महाशिवरात्री विषयी आणखी कथा असल्या तरी काही लोक या दिवसाला 'जलरात्री' असे देखील संबोधतात. महादेवांनी या दिवशी तांडव नृत्य केले होते आणि महादेवांना शांत करण्यासाठी आणि भूलोकाचा विनाश टाळण्यासाठी लोकांनी प्रार्थना केली होती. अशी देखील आख्यायिका पुराणांमध्ये सांगितली जाते.

महाशिवरात्रीला पूजा कशी केली जाते?
महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात. शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. देवाला प्रसाद म्हणून बांग देखील ठेवली जाते.
महाशिवरात्रीला जागरण का केले जाते?
महाशिवरात्रीला जागरणाचे खूप महत्त्व आहे. या दिनी भोलेनाथ व पार्वती यांचा विवाह झाला होता. यामुळे महिला रात्री जागरण करून भोलेनाथाची वरात काढतात. हे व्रत दीड दिवसाचे असते. त्यामुळे त्याचा दुसर्या दिवशी सकाळी समाप्त होतो. दुसर्या दिवशी महिला ब्राह्मण भोजन घालत पतीचा आशिर्वाद घेऊन महाशिवरात्रीच्या व्रताचा समारोप करत असतात.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications