महाकुंभ मेळ्यात टूथपिक्स विकून आकाश बनला स्टार! गर्लफ्रेंडच्या एका सल्ल्याने व्यवसायातून लाखो कमावले
Maha Kumbh 2025 Success Story: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळाव्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत आहे. या कुंभमेळ्यातून अनेकांना मोठा रोजगार सुध्दा मिळत आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील आकाश यादवने त्याच्या अनोख्या कहानीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.
टूथस्टिक्स विकून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आकाशला सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शो 'डान्स का महामुकाबला' मध्ये आमंत्रित करण्यात आलं आहे. आकाशचा हा प्रवास खूप प्रेरणादायी आणि संघर्षाने भरलेला आहे.

प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात चिंध्यापासून ते श्रीमंतीपर्यंत अनेक अज्ञात चेहरे सोशल मिडीयाच्या माध्यामातून समोर आले आहेत. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या चेहऱ्यांमध्ये हर्षा रिचारिया, मोनालिसा आणि आयआयटीयन बाबा अशी नावे आहेत. आता या यादीत आकाश यादवचे नावही जोडले गेले आहे. आकाशने महाकुंभात दातांच्या काड्या विकून केवळ आपली ओळख निर्माण केली नाही तर आपल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाने सोनी टीव्हीवरही स्थान मिळवलं आहे.
आकाश यादव हा जौनपूरच्या मडियाहू शहरातील रहिवासी आहे. दातांच्या काड्या विकून त्यांने महाकुंभात लाखो रुपये कमावले आहेत. त्याच्या या अनोख्या शैलीने शोमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यांची साधी भाषा आणि बोलण्याची पद्धत शोचे परीक्षक मिथुन चक्रवर्ती आणि मलायका अरोरा यांनाही प्रभावित केली. मडियाहू ते महाकुंभ आणि नंतर 'डान्स का महामुकाबला' ही त्याची कहाणी एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही.
गर्लफ्रेंडच्या एका सल्ल्याने आयुष्य बदललं
या शोमध्ये 19 वर्षांच्या आकाश आपल्या बिझनेसची आयडीया प्रेक्षकांना सांगितली. आकाश म्हणतो की वडीलांनी व्यवसाय करण्यासाठी मुंबईला बोलावलं होतं. त्यावेळी त्याने ही गोष्ट त्यांच्या गर्लफ्रेंडला सांगितली. पण त्याच्या गर्लफ्रेंडने मुंबई न जाता महाकुंभात बिझनेस करण्याचा सल्ला दिला. बिझनेस करण्यासाठी कोणतेही आर्थिक साहाय्य नसल्याचं आकाशने आपल्या गर्लफ्रेंडला सांगितले, तेव्हा त्यांच्या गर्लफ्रेंडने त्याला दात घासण्यासाठी लिंबाच्या काड्या विकण्याचा सल्ला दिला.
आकाशने गर्लफ्रेंडचा सल्ला मानून कोणत्याही गुंतवणुकीशिवाय टूथस्टिक्स विकून लाखो रुपये कमावले आहेत. महाकुंभात पोहोचताच त्याने पहिल्या रात्री बारा हजार रुपये कमावले तर संपूर्ण दिवसात हा आकडा तीस हजारांवर पोहोचला. कोणत्याही गुंतवणुकीशिवाय केलेल्या या व्यवसायाने आकाशच्या स्वप्नांना मोठ यश मिळालं आहे.
जौनपुर के लोग अलग ही तेजस्वी होते हैं
— Vineet kumar (@vineetspeaks) February 17, 2025
रामभद्राचार्य नाम के एक दृष्टिविहीन चर्चित व्यक्ति भी वहीं से हैं
लेकिन आकाश कुमार यादव ने अलग ही माहौल बनाया हुआ है
बाबू ने बेबी की जिंदगी बदल दी pic.twitter.com/sdWQkSkvey
आकाशने स्टेजवर सांगितले की, आजच्या काळात अनेक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची फसवणूक करत आहेत. तिथे त्याच्या गर्लफ्रेंडने कठीण काळात त्याला साथ दिली. तो म्हणाला की "आजकाल मुली त्यांच्या बाबूंना फसवतात, पण माझ्या बाबूने अपयशातही मला साथ दिली." या प्रामाणिकपणाने आणि सत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
या कमाईतून आकाशने एक नवीन मोबाईल खरेदी केला आहे. तसेच त्याच्या गर्लफ्रेंडसाठी कपडे आणि आईसाठी साडी देखील खरेदी केली. कोणत्याही गुंतवणुकीशिवाय इतक्या मोठ्या नफ्याने आकाशच्या स्वप्नांना नवीन उंची दिली आणि त्याचा आत्मविश्वास आणखी बळकट झाला आहे.
शोच्या मंचावर आकाशचा हटके अंदाज
'डान्स का महामुकाबला'च्या मंचावर आकाशने त्याची कहाणी इतक्या अनोख्या पद्धतीने सांगितली की, अभिनेता मिथुन चक्रवर्ती, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, रेमो डिसूझा, गीता कपूर आणि मलायका अरोरा देखील आश्चर्यचकित झाले. त्याने आकाशच्या साधेपणाची आणि त्याच्या मैत्रिणीप्रती असलेल्या निष्ठेची प्रशंसा केली.












Click it and Unblock the Notifications