Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या दराचा 'भडका'; तब्बल ५० रुपयांनी महागली टाकी; 'उज्ज्वला' धारकांनाही धक्का

LPG Cylinder Price Hike : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती वाढविण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि उज्ज्वला योजनेचा लाभ न घेणाऱ्या ग्राहकांना देखील मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. आज केंद्र सरकारने गॅस सिलेंडरमागे तब्बल 50 रुपयांची वाढ केली आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोमवारी यासंदर्भात मोठी घोषणा केली. अनुदानित आणि विनाअनुदानित ग्राहकांसाठी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे ही वाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू असणार आहे.

Gas cylinder prices increased

आता सिलिंडर किती रुपयांना मिळणार?

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, "एलपीजी सिलेंडरच्या किमतीत प्रति सिलेंडर ५० रुपयांनी वाढ होईल. उज्ज्वला योजना धारकांना ५०० रुपयांवरून आता सिलेंडर घेण्यासाठी ५५० रुपये लागतील. इतरांसाठी ते ८०३ रुपयांवरून ८५३ रुपये होईल. या भाववाढीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

भाववाढीचे कारण काय?

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी सांगितले की, आम्ही दर २-३ आठवड्यांनी या भाववाढीचा आढावा घेणार आहोत. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढ पेट्रोल आणि डिझेलवरील ग्राहकांवर लादली जाणार नाही.

त्या उत्पादन शुल्क वाढीचा उद्देश तेल विपणन कंपन्यांना गॅसच्या बाजूने झालेल्या ४३,००० कोटी रुपयांच्या नुकसानाची भरपाई करणे आहे. त्यामुळे सध्या फक्त एलपीजीच्या किंमती वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कधी लागू होणार भाववाढ

ही सुधारित भाववाढ उद्या म्हणजेच ८ एप्रिलपासून लागू होणार असल्याचे सांगण्यात आले. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ४१ रुपयांची कपात केल्यानंतर काही दिवसांतच आता ही नवीन भाववाढ करण्यात आली.

या सुधारणांनंतर, दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजीची सुधारित किरकोळ किंमत १,७६२ रुपये झाली आहे. हे एक दिलासा देणारे आहे, कारण १ मार्च रोजी ओएमसींनी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली होती. एकीकडे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवले पण सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही, असे सांगितले. पण दुसरीकडे सिलिंडरच्या दरात वाढ करून त्यांनी जोरदार दणका सामान्य जनतेला दिला असल्याची चर्चा देखील आता होऊ लागली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+