Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अजब प्रेमाची गजब गोष्ट, घरातील दागिने आणि रोकड घेऊन होणा-या जावयासोबत पळाली महिला

कधी कोण कोणाच्या प्रेम पडेल, याबद्ल काही सांगता येत नाही. तुम्ही आतापर्यंत प्रियकर- प्रेयसीच्या स्टोरी वाचल्या असतील पाहायला असतील मात्र सध्या अश्या एका प्रेमाच्या स्टोरीची चर्चा सुरु आहे. जे तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या मुलीच्या होणा-या नव-या सोबत सासू पळून गेल्याची ही घटना घडली आहे. ज्यामुळे या घटनेची देशभरात चर्चा सुरु आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या अलिगढच्या मडराक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहरपूर गावात घडली आहे.

दरम्यान 8 एप्रिलच्या संध्याकाळी सासू अनिता आपल्या होणा-या जावयासोबत पळून गेली आहे. एवढेच नव्हे तर लग्नासाठी घरात ठेवलेली रोख रक्कम आणि दागिनेही गायब आहेत. या विचित्र घटनेमुळे संपूर्ण कुटुंब आणि गावाला धक्का बसला आहे. या घटनेनंतर अनिता देवीचे पती जितेंद्र आणि त्यांची मुलगी पूर्णपणे कोलमडून गेले आहेत. जितेंद्रने त्याची पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तसेच ही घटना त्यांच्या लक्षात आल्यानंतर कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.

Love Story

कुटूंबाला बसला मोठा धक्का

आईच्या या कृत्याने मुलीला ही धक्का बसला आहे. तिची तब्येत ठीक नसल्याने मुलीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुलगी म्हणाली, "माझे आता माझ्या आईशी कोणतेही नाते नाही. ती वडिलांची कमाई आणि माझ्यासाठी ठेवलेले दागिने घेऊन पळून गेली. मला फक्त ते सर्व परत हवे आहे. तिने जे केले त्यामुळे आता आमचे कोणतेही नाते नाही", अशी प्रतिक्रिया त्या मुलीने दिली आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

अलीगढचे डेप्युटी एसपी महेश कुमार यांनी माध्यमांना दिलेल्या माहीतीनुसार सासू अनिता देवी आणि राहुल यांनी घराबाहेर पडण्यापूर्वी त्यांचे मोबाईल फोन बंद केले होते, त्यामुळे त्यांचे लोकेशन शोधणे कठीण होत आहे. दोघांचे शेवटचे लोकेशन अलीगढमध्ये आढळले होते, परंतु त्यानंतर मोबाईल नेटवर्कवर ट्रेस होत नाही. राहुल पूर्वी उत्तराखंडमधील रुद्रपूरमध्ये काम करत असल्याने, दोघेही तिथे जाऊन लपले असावेत असा पोलिसांना संशय आहे.

पळून जाण्यापूर्वी त्यांनी कोणाशी संपर्क साधला होता का हे शोधण्यासाठी पोलिस आता दोघांचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासत आहेत. या पळून जाण्यात त्याला तिसऱ्या व्यक्तीने मदत केली का, याबाबत चौकशी सुरु आहे. लग्नासाठी असलेली रोकड आणि दागिने पळवून नेणे हे सर्व आधीच नियोजित प्लॅन असल्याचे संकेत असू शकते, असे पोलिसांचे मत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+