भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्बेत बिघडली; अपोलो रुग्णालयात उपचार सुरु
LK Advani's condition is critical- भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालकृष्ण आडवाणी सध्या 97 वर्षांचे असून गेल्या काही दिवसांपासून ते सारखे आजारी असतात. आज सकाळी पुन्हा त्यांना तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

चार महिन्यांत चौथ्यांदा रुग्णालयात
लालकृष्ण आडवाणी यांचे वय सध्या 97 वर्षांचे आहे. त्यामुळे त्यांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या चार-पाच महिन्यांत त्यांना चार वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांची प्रकृती नाजून असल्याचे सांगितले जातेय. अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर डाँक्टरांच्या टीम उपचार करत आहे. लवकरच हाँस्पिटल त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देतील, असे सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही होता प्रकृतीचा त्रास
लालकृष्ण आडवाणी यांना यापूर्वी ऑगस्ट महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. 3 जुलैला लालकृष्ण आडवाणींना दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याआधी 26 जूनला दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आलेलं. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्यांची एक छोटीशी सर्जरी झाली होती. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज सकाळी पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घरी जाऊन दिला होता 'भारत रत्न'
लालकृष्ण आडवाणी मागच्या काही काळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच ते घरी असतात, कुठल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. आडवाणी यांना यावर्षी देशातील सर्वोच्च सम्मान 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पण आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात पुरस्कार स्वीकारण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदींच्या उपस्थितीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या घरी जाऊन 'भारत रत्न' पुरस्कार प्रदान केला होता.












Click it and Unblock the Notifications