Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सावधान! कुंभमेळ्यात आंघोळ करताय..? महिलांच्या आंघोळीचे व्हिडीओ विकताहेत सोशल मीडियावर

सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. या कुंभमेळ्याला अभूतपुर्व गर्दी होत आहे. हिंदू धर्मियांसाठी हा कुंभमेळा एक धार्मिक पर्वणी म्हणून ओळखला जात आहे. मात्र आता याच कुंभमेळ्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. महिलांच्या आंघोळीचे व्हिडीओ इन्टराग्राम टेलिग्रामवर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युपी पोलिस सोशल मीडियावरील असे अकाऊंट शोधून त्यांच्यावर कारवाई करत आहेत.

Kumbh Mela 2025

नेमके काय आहे प्रकरण?

कुंभमेळ्यात सध्या प्रचंड गर्दी आहे. अनेक कुटुंब येथे त्रिवेणी संगमात आंघोळीसाठी येत आहे. त्यातील काही महिलांचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ हे टेलिग्राम व इंन्टाग्राम या सोशल मिडिया अकाऊंटला व्हायरल करण्यात आले आहेत. हे प्रकार या महिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रयागराज येथील कोतवाली पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली. आता युपी पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून, असे अनेक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडे तक्रारी दाखल

सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमला असे आढळून आले की, काही प्लॅटफॉर्म महिला कुंभमेळ्यात स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे व्हिडिओ अपलोड करत आहेत. जे त्यांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे स्पष्ट उल्लंघन आहे. कोतवाली कुंभमेळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर अशा अकाऊंटवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली . १७ फेब्रुवारी रोजी एका महिला यात्रेकरूंने तिचे अयोग्य व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल एका इन्स्टाग्राम अकाउंटवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी मागविला डाटा

या गंभीर प्रकाराबाबत युपी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलिसांनी सांगितले की, त्यांनी अकाउंट ऑपरेटरची ओळख पटविण्यासाठी इंस्टाग्रामची मालकी आणि ऑपरेट करणारी तंत्रज्ञान कंपनी मेटाकडून माहिती मागवली आहे. तपशील प्राप्त झाल्यानंतर अटकेसह कारवाई केली करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले. १९ फेब्रुवारी रोजी नोंदवलेल्या दुसऱ्या प्रकरणात एक टेलिग्राम चॅनेल अशाच प्रकारचे व्हिडिओ विक्रीसाठी देत ​​असल्याचे आढळून आले. या चॅनेलविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत दोन सोशल मिडिया अकाऊंटवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+