Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Kolkata rape murder case : पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला पैसे देऊ केले!'कोणतीही जबाबदारी घेतली नाही

Kolkata rape murder case :कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणी आज 28 व्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. बुधवारी रात्री उशिरा डॉक्टरांचे पालकही या आंदोलनात सामील झाले. यादरम्यान पीडितेचे वडीलांनी एक आरोप केला असून त्यामुळे कोलकाता पोलिसांच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे.

पीडीतेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, पोलिस सुरुवातीपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत आम्हाला पोलीस ठाण्यात थांबावे लागले. नंतर जेव्हा मुलीचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला तेव्हा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला पैसे देऊ केले होते.

Kolkata rape murder case

कोलकाता बलात्कार-हत्या पीडितेचे पालक बुधवारी सुरु असलेल्या आंदोलनात सामील झाले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार-हत्याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा कोलकात्यात निदर्शने सुरूच होती. दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी बुधवारी रात्री राजभवनात मेणबत्ती पेटवली.

पीडितेच्या पालकांचे कोलकाता पोलिसांवर 2 आरोप

पहिला आरोप - हा की, अंत्यसंस्कार होईपर्यंत 300-400 पोलिसांनी आम्हाला घेराव घातला, पण अंत्यसंस्कार झाल्यानंतर एकही पोलिस तिथे दिसला नाही. कुटुंब काय करणार, घरी कसे जाणार, पोलिसांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही असं पीडितेच्या पालकांचं म्हणणं आहे.

दुसरा आरोप - हा की, पोलिस सुरुवातीपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नेईपर्यंत आम्हाला पोलीस ठाण्यात थांबावे लागले. नंतर जेव्हा मुलीचा मृतदेह आमच्या ताब्यात देण्यात आला तेव्हा एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आम्हाला पैसे देऊ केले होते.

पालकांची संतप्त प्रतिक्रीया

यावर पीडितेच्या पालकांची प्रतिक्रीया संतप्त होती. "घरी समोर मुलीचा मृतदेह पडून असताना आम्ही अश्रू ढाळत होतो, पोलिस पैसे देत होते, हीच का पोलिसांची माणुसकी? पोलिस म्हणत होते की त्यांनी सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत, यालाच जबाबदारी पार पाडणे म्हणतात का?"

कोलकात्यात डाॅक्टरांचे आंदोलन बनले जनआंदोलन

कोलकात्यात ज्युनियर डॉक्टरांचे निदर्शन हे जनआंदोलन बनले आहे पीडितेच्या आरोपींना कधी न्याय मिळेल या प्रश्नांची उत्तरे या आंदोलकांना माहित नाहीत. पण, तरीही एक नैतिक बळ दिले जात आहे, त्यामुळे या कनिष्ठ डॉक्टरांचे मनोबल उंचावत आहे. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये आणि विशेषत: राजधानी कोलकात्यात आंदोलन करणाऱ्या या कनिष्ठ डॉक्टरांना नैतिक बळ देणारे लोक आता उभे ठाकत आहेत. स्थानिक जनताही या आंदोलनात भक्कमपणे पाठीशी उभे राहीले आहेत. तर दुसरीकडे जनआंदोलनामुळे ममता सरकारवर आणखी प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+