कोलकत्ता बलात्कार प्रकरणाचा पाच महिन्यांनी लागला निकाल; आरोपी संजय रॅाय दोषी, काय मिळणार शिक्षा?

कोलकत्याच्या आरजी कर मेडिकल काँलेजमध्ये पाच महिन्यांपूर्वी एका महिला डाँक्टरवर बलात्कार करुन, तिचा खून करण्यात आला होता. ८ ऑगस्ट २०२४ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर पोलिसांनी संजय राँय याला अटक केली होती. आता या प्रकरणाचा निकाल सियाहद कोर्टाने सुनावला आहे. त्यांनी आरोपी संजय राँय याला दोषी ठरवले आहे.

Sanjay Roy

काय होती घटना?

आरजी कर मेडिकल काँलेजमधील एका महिला डाँक्टरवर ८ ऑगस्ट 2024 च्या मध्यरा‍त्री बलात्कार झाला होता. त्यानंतर या डाँक्टरची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर देशभर एकच खळबळ उडाली. संपूर्ण देशभरात वातावरण तापलं होतं. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये प्रचंड आंदोलन झालं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून या प्रकरणाचा तपास 13 ऑगस्ट रोजी सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. सीबीआयने या प्रकरणात आरोपीविरोधात मजबूत पुरावे गोळा केले. तसेच 120 साक्षीदाराच्या साक्षी नोंदवल्या. या प्रकरणात 66 दिवस ऑन कॅमेरा ट्रायल सुरू होती. अखेर कोर्टानं या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवलं आहे.

सीबीआयची भूमिका महत्त्वाची

या प्रकरणात सीबीआयनं संजय रॉय याला अटक केली होती. पीडितेच्या शरीरावर जे लाळीचे नमुने आढळून आले त्याचा डीएनए आरोपीच्या डीएनएशी जुळला होता. आरोपीने आधी बलात्कार केला आणि नंतर या महिला डॉक्टरची हत्या केली, अशी माहिती सीबीआयनं न्यायालयात दिली. पिडीता स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. तीने आरोपीवर वार करण्याचा देखील प्रयत्न केला. तिच्या नखाचे ओरखाडे आरोपीच्या शरीरावर देखील होते, अशी माहिती सीबीआयनं न्यायालयाला दिली होती.

आरोपी ठरवला दोषी

या घटनेनंतर तब्बल पाच महिने कोर्टाने सगळे पुरावे व साक्षीदाराच्या नोंदी तपासल्या. अखेर आरोपी संजय राँय याला दोषी ठरविण्यात आले. आज कोर्टाने याबाबतचा निकाल दिला. आता सोमवारी आरोपीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+